Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी झाली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगाराचे नाव राजुकुमार बालेश्वर सिंह (रा. सेमरा, अनुग्रह नगर, सिवान, बिहार) असे आहे. तो पोर्ट परिसरातील बी-५ कोल शेडवर उंचावर लोखंडी पर्लिंगचे काम करत होता. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामाची वेळ संपल्यानंतर राजुकुमार इतर सहकाऱ्यांसोबत खाली उतरत होता. त्यावेळी त्याने सुरक्षा हूकचा वापर केला होता. मात्र, पुढे सरकताना हूक बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान तो व्यवस्थित अडकला नाही. त्याच वेळी त्याचा पाय फायबरच्या पत्र्यावर पडला. वजनाचा ताण सहन न झाल्याने पत्रा तुटला आणि राजुकुमार ४५ मीटर उंचीवरून जमिनीवर कोसळला. त्यामुळे त्याच्या हाताला, पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मरण पावल्याचे सांगितले. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

IND vs WI: टीम इंडिया इंदूरमध्ये पलटवार करणार की विंडीज बाजी मारणार? रोहितचा विक्रम रडारवर!

वेस्ट इंडिजने टी20 मालिकेत जोरदार कमबॅक केले आहे! पहिल्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर,

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

एका कुत्र्यामुळे नात्यांची गोष्ट उलगडणार; सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखलेच्या ‘कापूसकोंडा’चा एकदम हटके टीझर प्रदर्शित

मुंबई: मराठी सिनेसृष्टीकडून प्रेक्षकांना विविध आशयघन कलाकृती असलेले चित्रपट पाहायला मिळत आहेत. आपण बऱ्याचदा

अहिल्यानगर येथे एफडीएची धडक कारवाई! प्रसिद्ध बेकरीचा परवाना निलंबित

अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी येथील 'रॉयल बेकर्स अँड कन्फेक्षनर्स' या

स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रंगणार दै. ‘प्रहार’चा १८ वा वर्धापनदिन सोहळा - माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, नीलम राणे, मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : सत्याची धार आपल्या शब्दांतून जपत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या दैनिक ‘प्रहार’च्या १८ व्या

मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन तीन महिन्यांत पूर्ण करणार; महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : मुंबई शहरातील सात कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती