Ashok Kharat : विश्वास बसणार नाही ! नावही तेच अन... ; शिर्डीत आणखी एक भोंदू अशोक खरात समोर

Ashok Kharat : नाशिकमधील अशोक खरात हा राज्यात काय तर देशात चर्चेत आहे. अशोक खरात सध्या कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. पण अशोक खरातही बाहेरही होता असं म्हटल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही ! नावही तेच अन कामही. शिर्डी पोलिसांनी आणखी एका अशोक खरात नावाच्या भोंदूला अटक करून मोठी कारवाई केली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह निर्विघ्न पार पडावा आणि विवाहानंतर जोडप्यावर नातेवाईकांनी केलेली करणी दूर करावी, असे आमिष दाखवत या भोंदूने एका जोडप्याकडून तब्बल ५१ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील भोंदू अशोक संपत खरात आणि राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील माया विठ्ठल कुसळकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील पलूस येथील अभिजित निकम या तरुणाने शिर्डी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


सांगली जिल्ह्यातील अभिजित निकम याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे लग्न देखील झाले होते. मात्र हा विवाह तरुणीच्या घरच्यांना मान्य नव्हता. त्यामुळे तिच्या पालकांनी भोंदू अशोक खरात याच्याशी संपर्क साधला. नोव्हेंबर 2025 मध्ये खरात आणि माया कुसळकर यांनी अभिजित व त्याच्या सासरच्यांची भेट घेतली. आमच्यात दैवी शक्ती आहे. तुमचा आंतरजातीय विवाह टिकवायचा असेल तर पूजा करावी लागेल, नाहीतर लग्न टिकणार नाही, अशी भीती घातली. यासाठी लग्नाआधी आणि लग्नानंतर गोदावरी नदीपात्रात अमावस्येला आंघोळ घालण्याचे ठरवून प्रत्येक पूजेचे 3 हजार रुपये घेतले.


माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये या भोंदू अशोक खरातने अभिजितला "तुझ्या चुलत्याने तुझ्यावर करणी केली आहे. त्यामुळे कुटुंबाचे वाईट होईल" अशी नवीन भीती दाखवली. 6 डिसेंबर 2025 रोजी सावळीविहीर येथील माया कुसळकर हिच्या घरी पूजा मांडण्यात आली. या पूजेदरम्यान माया कुसळकर हिने केस मोकळे सोडून अंगात देवी आल्याचे ढोंग केले. तर अशोक खरात मंत्रोच्चार करत असल्याचे भासवले. पूजेच्या नावाखाली त्यांनी ऑनलाइन आणि रोख स्वरूपात 36 हजार 744 रुपये उकळले.



तुझ्या पत्नीवर करणी


भोंदू अशोक खरातच्या सांगण्याप्रमाणे पुढे अमावस्येचे पैसे न दिल्याने तुझ्या पत्नीवर करणी झाली आहे, असे सांगून त्यांनी पत्नीला माहेरी बोलावून घेतले. 24 एप्रिल 2026 रोजी ती माहेरी निघून गेली. त्यानंतर पत्नी पुन्हा नांदायला येण्यासाठी आणि तिच्यावरची करणी काढण्यासाठी 14 जून 2026 रोजी पुन्हा 21 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. अभिजितने असमर्थता दर्शविल्यावर 8 हजारात सौदा ठरला.



शेवटी पर्दाफाश झालाच


आपली भोंदुगिरीतून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर अभिजितने 14 जून 2026 रोजी सावळीविहीर येथे जाऊन आधी पूजेचे नाटक केले. तिथे पुन्हा माया कुसळकर हिने अंगात देवी आल्याचे ढोंग करून पुढील अमावस्येला अजून एक पूजा करावी लागेल, असे सांगितले. आपली पूर्णपणे फसवणूक झाल्याची खात्री पटताच अभिजितने थेट शिर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.नोव्हेंबर 2025 ते 14 जून 2026 या कालावधीत भोंदू अशोक खरात आणि साथीदार माया विठ्ठल कुसळकर या आरोपींनी संगनमत करून एकूण 51 हजार ,744 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात अशोक खरात आणि त्याच्या साथीदाराविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूने अशाच प्रकारे आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. आर्थिक लाभासाठी अंधश्रद्धेचा आधार घेत लोकांना गंडा घालणाऱ्या या प्रकरणाचा शिर्डी पोलीस सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या