FIFA World Cup 2026 : जर्मनीचा गोलवर्षाव! कुरासाओचा ७-१ ने धुव्वा; विश्वचषक पदार्पण करणाऱ्या संघालाही मिळाली उभे राहून दाद

फिफा विश्वचषकात चार वेळच्या विजेत्या जर्मनीने आपली ताकद दाखवत विश्वचषक पदार्पण करणाऱ्या कुरासाओचा ७-१ असा दणदणीत पराभव केला. सुरुवातीला कुरासाओने जर्मनीला धक्का दिला असला, तरी त्यानंतर जर्मन खेळाडूंनी एकहाती वर्चस्व गाजवत गोलांचा पाऊस पाडला. काई हाव्हर्ट्झने दोन गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (FIFA World Cup 2026)


सामन्याच्या अवघ्या सहाव्या मिनिटाला फेलिक्स नेमेचाने फ्लोरियन व्हिर्ट्झच्या पासवर गोल करत जर्मनीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र २१व्या मिनिटाला कुरासाओच्या लिवानो कोमेनेंसियाने शानदार गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. विश्वचषकातील कुरासाओचा हा पहिलाच गोल ठरला आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. (FIFA World Cup 2026)


कुरासाओच्या आनंदावर जर्मनीने लवकरच पाणी फेरले. ३८व्या मिनिटाला निको श्लोटरबेकने कॉर्नरवर हेडरद्वारे गोल करत जर्मनीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत मिळालेल्या पेनल्टीवर काई हाव्हर्ट्झने अचूक निशाणा साधत जर्मनीची आघाडी ३-१ अशी वाढवली. (FIFA World Cup 2026)



दुसऱ्या हाफमध्ये जर्मनीने आणखी आक्रमक खेळ करत कुरासाओच्या बचावफळीची अक्षरशः दाणादाण उडवली. ४७व्या मिनिटाला जमाल मुसियालाने चौथा गोल केला. ६८व्या मिनिटाला नॅथॅनियल ब्राउनने पाचवा गोल झळकावला, तर ७८व्या मिनिटाला डेनिस उंडावने संघाच्या खात्यात सहावा गोल जमा केला. सामन्याच्या ८८व्या मिनिटाला हाव्हर्ट्झने दुसरा वैयक्तिक गोल करत जर्मनीचा विजय ७-१ असा भव्य केला. (FIFA World Cup 2026)


जर्मनीने विश्वचषक मोहिमेची दमदार सुरुवात केली असली, तरी या सामन्यात कुरासाओनेही सर्वांची मने जिंकली. विश्वचषकात खेळणारा सर्वात छोटा देश ठरलेल्या कुरासाओच्या संघाला मध्यंतरावेळी मैदान सोडताना प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात दाद दिली. (FIFA World Cup 2026)


या सामन्यात आणखी एक ऐतिहासिक योगायोग पाहायला मिळाला. कुरासाओचे ७८ वर्षीय प्रशिक्षक डिक अॅडव्होकेट आणि जर्मनीचे ३८ वर्षीय प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन यांच्यात विश्वचषक इतिहासातील प्रशिक्षकांमधील सर्वात मोठे वयाचे अंतर पाहायला मिळाले. (FIFA World Cup 2026)



दरम्यान, जवळपास दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पुनरागमन करणाऱ्या अनुभवी गोलरक्षक मॅन्युएल न्युअरनेही जर्मनीसाठी प्रभावी कामगिरी केली. आता जर्मनीचा पुढील सामना आयव्हरी कोस्टविरुद्ध होणार असून कुरासाओचा संघ इक्वेडोरशी दोन हात करणार आहे. (FIFA World Cup 2026)

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त