Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की

कोलंबो : भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील रोमहर्षक झुंज केवळ निकालामुळेच नाही, तर मैदानावर झालेल्या वादावादीमुळेही चर्चेचा विषय ठरली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात सुपर ओव्हरनंतर श्रीलंकेने बाजी मारली, मात्र विजयानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याने मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



निर्धारित ५० षटकांच्या खेळात दोन्ही संघांनी प्रत्येकी २६५ धावा केल्याने सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने विजयासाठी १७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे मैदानात उतरले. अखेरच्या तीन चेंडूंवर १४ धावांची गरज असताना वैभवला केवळ ७ धावाच करता आल्या आणि भारताने हा सामना गमावला. पराभवाच्या पदरी पडलेल्या निराशेतून आणि मैदानावरील तणावातून वादाची ठिणगी पडली.



सामना संपल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू विजयाचा जल्लोष करत असतानाच, भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या एका क्षेत्ररक्षकामध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर बघता-बघता धक्काबुक्कीत झाले. वैभवचा संताप इतका अनावर झाला होता की, त्याने श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का दिला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून तिकडूनही तसेच कृत्य झाले. अखेर सूर्यांश शेडगे आणि श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांनाही एकमेकांपासून दूर केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.



मैदानावर निर्माण झालेल्या या तणावामागे खराब प्रकाशयोजनेचे कारण असल्याचे बोलले जात आहे. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रकाश कमी असल्याने अंपायर सुपर ओव्हर घेण्यास तयार नव्हते, ज्यावरून भारताचा कर्णधार तिलक वर्मा आणि अंपायर यांच्यात बराच काळ वादावादी झाली होती. याच पार्श्वभूमीवर खेळाडू आधीच तणावाखाली होते आणि पराभवाच्या झटक्यानंतर या रागाचा स्फोट मैदानावर झाला.



तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सूर्यांश शेडगे आणि विप्रज निगम यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ४९.२ षटकांत २६५ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात अरशद खानच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेलाही ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात २६५ धावांपर्यंतच मजल मारता आली. जरी मैदानावर काही काळ कटुता निर्माण झाली असली, तरी सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. अफगाणिस्तान 'ए' विरुद्धच्या पराभवानंतर इंडिया 'ए' चा या मालिकेतील हा सलग दुसरा पराभव ठरला आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून