FIFA World Cup 2026 : सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यात रोमांचक लढत; सामना १-१ च्या बरोबरीत सुटला

फ्लोरिडा : फिफा वर्ल्ड कप 2026 ग्रुप-H मध्ये सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यात महत्त्वाचा सामना झाला. या सामन्यात कोणत्याही संघाला विजय मिळवता आला नाही. यामुळे सामाना १-१ च्या बरोबरीत संपला.दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले,मात्र अखेर प्रत्येकी एक गोल करत गुणांची विभागणी करावी लागली.


 

 

सौदी अरेबियाची पहिली आघाडी

सामन्याच्या सुरुवातीला उरुग्वेने चेंडूवरील नियंत्रण राखत आक्रमक खेळ केला. मॅक्सी अराउजो आणि फेडेरिको विनास यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले,पण सौदी अरेबियाचा अनुभवी गोलरक्षक मोहम्मद अल ओवैस याने चांगली कमगिरी करत संघाला अडचणीत बाहेर काढले.यानंतर सौदी अरेबियाने सेट पीसवर दबाव निर्माण केला. एका कॉर्नर किकवर हसन अल तंबाक्ती याचा हेडर उरुग्वेचा गोलरक्षक फर्नांडो मुस्लेरा पूर्णपणे रोखू शकला नाही. त्यानंतर आलेल्या रिबाउंडवर अब्दुलेलाह अल अमरी याने अचूक फिनिश करत सौदी अरेबियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये उरुग्वेने आक्रमणाची धार अधिक तीव्र केली. मॅन्युअल उगार्टे याचा जोरदार शॉट पोस्टला लागून परत आला, तर फेडेरिको विनासनेही अनेक संधी निर्माण केल्या.अखेरीस 80 व्या मिनिटाला उरुग्वेला यश मिळाले. विनासच्या हेडरला अल ओवैस पूर्णपणे नियंत्रित करू शकला नाही आणि चेंडू रिबाउंड झाल्यानंतर मॅक्सी अराउजो याने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.



मुस्लेराचा ऐतिहासिक विक्रम


या सामन्यात उरुग्वेचा गोलरक्षक फर्नांडो मुस्लेरा याने इतिहास रचला. 39 वर्षे 364 दिवस वयात वर्ल्ड कपमध्ये खेळणारा तो उरुग्वेचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.यापूर्वी हा विक्रम उरुग्वेचे माजी कर्णधार Diego Godín यांच्या नावावर होता. मुस्लेराने त्यांच्यापेक्षा तीन वर्षांहून अधिक वयात वर्ल्ड कप सामना खेळत नवा विक्रम आपल्या नावावर केला.



दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा गुण


या बरोबरीनंतर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गुण मिळवला असून ग्रुप-H मधील पुढील सामन्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. सौदी अरेबियाने शिस्तबद्ध बचाव आणि सेट पीसवर प्रभावी खेळ दाखवला, तर उरुग्वेने पिछाडीवरून पुनरागमन करत पराभव टाळला.उरुग्वेसाठी मॅक्सी अराउजोचा गोल आणि मुस्लेराचा विक्रम, तर सौदी अरेबियासाठी अब्दुलेलाह अल अमरीचा महत्त्वाचा गोल हा या सामन्याचा मुख्य आकर्षण ठरला.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर