Nashik Crime : लग्नाआधीच झाली त्याची हत्या, आठ वर्षांच्या प्रेमकथेचा असा झाला शेवट

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी गावात एका २५ वर्षीय मुलाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव सचिन चौरे आहे. सचिन हा कन्हेरवाडी परिसरातील एका मुलीच्या प्रेमात होता. आठ वर्षांपासून ते प्रेमात होते आणि ते होते. लवकरच लग्न करणार दोघांच्या घरच्यांची या लग्नाला संपत्ती होती. मात्र अचानक मुलीच्या भावाने सचिन ची हत्या केली.



का केली हत्या ?
सचिन चौरेचे एका तरुणीसोबत गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु सुरुवातीला कुटुंबीयांचा या प्रेमाला विरोध होता. मात्र तरुणीने सचिन सोबतच लग्न करणार असे ठामपणे घरच्यांना सांगितले. कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर तिने घरात जेवणही बंद केले अखेर घरच्यांनी माघार घेतली आणि लग्नाला संमती दिली. मुलीचे वडील आणि मामा यांनी सचिनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांची बैठक घेण्यात आली आणि लग्नाला संमती देण्यात आली. मात्र हे लग्न तरुणीच्या दोन भावांना मान्य नव्हते त्यांनी सचिनला मारण्यासाठी षडयंत्र रचलं



माहिती नुसार : सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अचानक तरुणीचे दोन भाऊ कन्हेरवाडी परिसरात पोहचले. ते सचिनच्या घरी गेले आणि त्यांनी सचिन वर तीक्ष्ण हत्याराने वार केले.सचिन गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटने नंतर त्यांनी घटनस्थळावरून पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना पकडलं आणि चांगलाच चोप दिला. दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. आता पुढील तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण