Indian Womens Hockey Team :भारतीय महिला हॉकी संघाचा विजय, जपानला हरवल्यामुळे उपांत्य फेरीचा प्रवेश झाला सोपा

मुंबई: भारतीय हॉकी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवार, १६ जून रोजी ऑकलंडमधील नॉर्थ हार्बर नॅशनल हॉकी सेंटर येथे झालेल्या पूल अ च्या दुसऱ्या सामन्यात जपानला २-१ ने पराभूत केले.या विजयासह, संघाने न्यूझीलंड एफआईएच हॉकी महिला नेशंस कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या निर्णायक सामन्यात,भारतीय कर्णधार सलीमा टेटेने ३३ व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, लालरेम्सियामीने ४९ व्या मिनिटाला गोल करून विजय निश्चित केला. जपानकडून झालेला एकमेव गोल हिरामित्सूने ३५ व्या मिनिटाला केला.



सलग दोन सामन्यात, दोन विजय


भारतीय संघाने या स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले आहेत. या विजयांमुळे भारताने सहा गुण मिळवले आहेत. संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित मानले जात आहे. या सामन्यात भारतीय मिडफिल्डर ज्योतीने भारतीय संघासाठी आपला १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक अविस्मरणीय टप्पा गाठला.(SPORTS)






दोन मिनिटांच्या आतच जपानने गोल करून प्रत्युत्तर दिल्याने भारताची आघाडी संपुष्टात आली आणि सामना १-१ असा बरोबरीत आला. ३५ व्या मिनिटाला हिरामित्सूने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून सामना बरोबरीत आणला. अंतिम क्वार्टर संपत असताना,भारताच्या लालरेम्सियामीने ४९ व्या मिनिटाला गोल केला. अमेरिका आणि जपानवरील विजयानंतर, या विजयामुळे भारत सहा गुणांसह अ गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे. स्पर्धेतील अ गटातील भारताचा अंतिम सामना १८ जून रोजी उरुग्वेविरुद्ध होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या जागेसाठी जपान आणि अमेरिका त्याच गटात एकमेकांविरुद्ध खेळतील.अंतिम क्वार्टर निर्णायक वळणावर असताना भारताच्या लालरेम्सियामीने ४९ व्या मिनिटाला गोल केला. भारताने या विजयामुळे अमेरिका आणि जपानविरुद्धच्या विजयांसह सहा गुण मिळवून ए ग्रुपमध्ये अव्वल स्थान गाठले.या स्पर्धेत भारताचा पूल ए मधील शेवटचा सामना १८ जून रोजी उरुग्वेविरुद्ध आहे. तर त्याच गटात दुसऱ्या उपांत्य फेरीच्या जागेसाठी जपान आणि अमेरिका एकमेकांविरुद्ध खेळतील
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून