Kalyan Crime : कल्याणमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना; आरोपी पती अटकेत

कल्याण: शहरात महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या घटनेत हुंड्यासाठी विवाहितेचे जबरदस्तीने टक्कल केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



१. किरकोळ वादातून पतीकडून पत्नीची हत्या


कल्याणमधील मलंग रोड (शंभर फुटी रोड) परिसरात १० जून रोजी ही दुर्दैवी घटना घडली. मुबीन खान आणि त्यांची पत्नी आयशाबानो यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. १० जूनला झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या मुबीन खानने आयशाबानोला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत आयशाबानो गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आयशाबानो यांच्या बहिणीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुबीन खान याला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.



२. हुंड्यासाठी विवाहितेचे टक्कल; पतीसह चौघांवर गुन्हा


कल्याणमधील वालधुनी परिसरात हुंड्यासाठी एका विवाहितेचा अमानुष छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सासरच्या मंडळींनी विवाहितेचे जबरदस्तीने टक्कल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या छळाला कंटाळून पीडितेने कशीबशी सासरच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि आपल्या माहेरी आश्रय घेतला. सध्या पीडितेवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.



गुन्हा दाखल झालेले आरोपी: पीडितेने केलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:





  • समीर अन्सारी (पती)




  • हिना अन्सारी (नणंद)




  • शहनाज अन्सारी (सासू)




  • सासूची मोठी बहीण




या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत असून, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने