Mumbai Mayor Accident : मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) महापौर रितु तावडे (Mayor Ritu Tawde) यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात (Sion Bridge Accident) झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ताफ्यातील वाहनांची एकमेकांवर धडक झाली. सुदैवाने या अपघातात महापौर रितु तावडे यांच्यासह ताफ्यातील कोणालाही दुखापत झाली नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, महापौर रितु तावडे या एका नियोजित कार्यक्रमासाठी आपल्या ताफ्यासह जात होत्या. सायन पुलावरून प्रवास करत असताना अचानक एक दुचाकीस्वार ताफ्यासमोर आला. त्याला वाचवण्यासाठी ताफ्यातील आघाडीच्या एस्कॉर्ट वाहनाच्या चालकाने तातडीने ब्रेक लावला.


एस्कॉर्ट वाहन अचानक थांबल्याने त्यामागे असलेल्या महापौरांच्या वाहनाची समोरील गाडीला धडक बसली. त्यानंतर मागील एस्कॉर्ट वाहनही समोरील वाहनावर आदळले. त्यामुळे ताफ्यातील तीन वाहने एकमेकांवर धडकली.


अपघातानंतर काही काळ सायन पुलावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वाहनांचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत ताफ्यातील वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून महापौरांसह सुरक्षा रक्षक आणि चालक सुखरूप आहेत.



घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सायन पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


दरम्यान, महापौरांचा पुढील प्रवास सुरळीत सुरू राहावा यासाठी तातडीने पालिकेच्या ताफ्यातील पर्यायी वाहनाची व्यवस्था करण्यात आली. नुकसानग्रस्त वाहने बाजूला करून महापौरांना दुसऱ्या वाहनातून पुढील कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४