Orry Reel Earnings: ओरीच्या एका रीलची कमाई ऐकून फुटेल घाम ! तुम्ही विचारही करू शकत नाही अशी आहे कमाई

Orry Reel Earnings: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस आता फक्त प्रसिद्धीपुरते मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया आता पैसे कमवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. लोक लाखो रुपये या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमवत आहे. आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे सोशल मीडिया सेन्सेशन ओरी. ओरी हा त्याच्या सेलिब्रिटींसोबतच्या फोटोने कायम प्रकाशझोतात असतो. आता पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि यावेळेस चर्चा फोटोची नाही तर कमाईची आहे.



एका रीलसाठी घेतले 76 लाख रुपये


ओरीने नुकताच एका मुलाखतीत त्याच्या एका रिलच्या कमाईचा खुलासा केला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली आहे. एका ब्रँड डीलसाठी आणि एका रीलसाठी त्याला तब्बल 76 लाख रुपये मिळाल्याचं ओरीने सांगितलं आहे. एवढी मोठी रक्कम ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत.


काही सेकंदांच्या रीलमधून लाखोंची कमाई होऊ शकते? हा प्रश्न आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी इन्फ्लुएंसर कल्चरवर टीका करत एवढ्या मोठ्या मानधनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे काहींचं मत आहे की, डिजिटल युगात लोकांचं लक्ष वेधून घेणं हीच खरी ताकद आहे आणि त्याचीच ही किंमत आहे.



सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस


दरम्यान, सोशल मीडियावर या विषयावर मीम्सचाही पाऊस पडत आहे. काही युजर्स मजेशीर अंदाजात म्हणत आहेत, “ओरीला एका रीलसाठी 76 लाख मिळतात आणि आम्हाला आमच्या कंटेंटमधून 7,600 रुपयेही मिळत नाहीत!” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


विशेष म्हणजे, ओरी कोणताही अभिनेता, उद्योगपती नाही. मात्र बॉलिवूड पार्टींमधील उपस्थिती, स्टार किड्ससोबतचे फोटो आणि सोशल मीडियावरील त्याची वेगळी ओळख यामुळे त्याने स्वतःचा ब्रँड तयार केला आहे. आज जाहिरातींचं स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पूर्वी टीव्ही, वर्तमानपत्र किंवा होर्डिंग्जवर भर असायचा. पण आता कंपन्या थेट सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. कारण लोक जाहिरातींपेक्षा त्यांच्या आवडत्या क्रिएटर्सच्या शिफारशींवर अधिक विश्वास ठेवतात.



आर्थिक व्यवहारांवर अजूनही पालक लक्ष ठेवतात


ओरीच्या या 76 लाखांच्या डीलमुळे पुन्हा एकदा इन्फ्लुएंसर मार्केटिंगची ताकद समोर आली आहे. फॉलोअर्स, एंगेजमेंट आणि व्हायरल होण्याची क्षमता हेच आता डिजिटल जगातील नवीन चलन बनत चाललं आहे. विशेष बाब म्हणजे, एवढी मोठी कमाई करूनही ओरीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याच्या आर्थिक व्यवहारांवर अजूनही त्याचे पालक लक्ष ठेवतात. त्यामुळे ही बाबही तितकीच चर्चेत आली आहे.


ओरीबद्दल मतं वेगवेगळी असू शकतात. काहींना त्याची लोकप्रियता अतिशयोक्ती वाटू शकते, तर काहींना तो डिजिटल युगातील यशाचं उदाहरण वाटतो. पण एक गोष्ट मात्र नक्की 'लोक त्याच्याबद्दल बोलत आहेत'. आणि आजच्या सोशल मीडिया युगात, चर्चेत राहणं हीच सर्वात मोठी ताकद मानली जाते.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’