बंदर कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम - मंत्री नितेश राणे

मुंबई: सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी संबंधित विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात यावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. विद्यमान आयटीआय इमारतींमध्येच विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले जाणार असून, अद्ययावत व उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.


राज्यातील बंदरे क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने बंदरे विभागाशी निगडित आयटीआय कौशल्य विकास व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक अधिसूचना जारी करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.बैठकीत निवडक आयटीआय संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सागरी व किनारी भागांमधील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना करण्यावर विशेष भर देण्यात आला.


विशेषतः शिप बिल्डिंग, पोर्ट ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, मरीन मेकॅनिक्स, कोस्टल मॅनेजमेंट आणि सागरी सुरक्षा यांसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. वाढवण बंदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा विचार करून उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले. स्थानिक युवकांना प्राधान्याने प्रशिक्षण देऊन त्यांना बंदर क्षेत्रातील रोजगारासाठी सक्षम करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप , कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक , राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सहसचिव विकास ढाकणे , कौशल्य विभागाचे सल्लागार चिन्मय शेटे व इंद्रराज राणे ,रूरल एनहान्सर्स ग्रुप चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर आयडे,वॅगन्स लार्निंग लिमिटेड चे उदय शेट्टी,अश्विन कसलीवाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने