BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर बेस्ट प्रशासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम (मेस्मा) २०२३ लागू केला आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा आणि वीजपुरवठा या अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असल्याने मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.



संयुक्त कृती समितीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास परिवहन आणि विद्युत विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने संपकाळात बससेवा आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.



प्रशासनाने १८ जूनपासून संप मागे घेईपर्यंत सर्व प्रकारच्या नव्या रजांच्या अर्जांवर स्थगिती घातली आहे. विभागप्रमुखांना कोणतीही नवी रजा मंजूर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, १८ जूनपूर्वी मंजूर झालेल्या रजा, वैद्यकीय कारणांवरील रजा तसेच संबंधित अधिकाऱ्यांना समाधानकारक वाटणाऱ्या कारणांवरील रजांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय संपाच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी अथवा ड्युटी बदलण्याच्या विनंत्याही योग्य पडताळणीशिवाय स्वीकारल्या जाणार नसल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कामगार संघटना आणि प्रशासन यांच्यातील मतभेद कायम असले तरी मुंबईतील अत्यावश्यक सेवा अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या