Megablock Update : रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लकविषयी मोठी बातमी

मुंबई : नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा (NEET-UG 2026 Re-Exam) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार आहे. या फेरपरीक्षेच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रविवार २१ जून रोजी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक नसतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. याचा मोठा फायदा रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना होणार आहे.



रविवार २१ जून रोजी लोकल रविवारच्या वेळापत्रकाऐवजी नियमित वेळापत्रकानुसार धावतील. यामुळे प्रवास करणे सोपे होणार आहे. पश्चिम रेल्वे रविवारी जम्बो ब्लॉक घेणार नाही, लोकल रविवारच्या वेळापत्रकाऐवजी नियमित वेळापत्रकानुसार धावतील; अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. तसेच नीटची फेरपरीक्षा असल्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक, नातलग यांना त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण नेटवर्कवर कुठेही मेगाब्लॉक घेणार नसल्याचे मध्य रेल्वेच्या प्रशासनाने जाहीर केले आहे.



नीट यूजी २०२६ फेरपरीक्षेच्या केंद्रांवर येणे - जाणे सोपे व्हावे यासाठी फेरपरीक्षेच्या दिवशी म्हणजेच रविवार २१ जून रोजी मेगाब्लॉक घेणार नसल्याची ग्वाही पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनाने दिली आहे. यामुळे रविवारी प्रवासाचे नियोजन करत असलेल्या सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.



याआधी ३ मे २०२६ रोजी देशभर नीट यूजी २०२६ परीक्षा झाली. परीक्षा सुरू झाल्यानंतर काही तासांनी पेपरफुटीची माहिती समोर आली. अखेर ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द केल्याचे १२ मे रोजी जाहीर करण्यात आले. यानंतर फेरपरीक्षेची घोषणा करण्यात आली. घोषणेनुसार आता रविवार २१ जून २०२६ रोजी नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा होत आहे. ही परीक्षा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मुलं, त्यांचे पालक आदी मुंबईत येत आहेत. या विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये आणि रविवारी परीक्षा केंद्रावर जाणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारचे नियोजीत मेगाब्लॉक रद्द केले आहेत. मुलांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे सोपे व्हावे या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मार्गांवर मेगाब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.



नीट फेरपरीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी केंद्र सरकारकडून टेलिग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षेआधी प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे खोटे दावे, फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर आळा घालण्यासाठी भारतातील टेलिग्रामवरील प्रवेश २२ जूनपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. तसेच मेसेज एडिट करण्याची सुविधाही ३० जूनपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. नीट यूजी २०२६ फेरपरीक्षेप्रकरणी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन एनटीएने विद्यार्थ्यांना केले आहे.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या