Fuel theft racket busted in Wadala : वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश; अन्न, नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई, १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.अन्न, नागरी पुरवठा विभागाचे नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १६ जून २०२६ रोजी दक्षता पथकाने वडाळा परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन इंधन टँकरचे सील तोडून त्यातील इंधन प्लास्टिक कॅनमध्ये भरून चोरी केली जात असल्याचे आढळून आले.


दक्षता पथकाने घटनास्थळी एका व्यक्तीस रंगेहाथ पकडले. तपासात २० लीटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये प्लास्टिक पाईप व व्हॉल्वच्या साहाय्याने इंधन काढले जात असल्याचे उघड झाले. पथकाने तपासणी केलेल्या एमएच-०४ केयू-१८२६ या टँकरमध्ये १० हजार लीटर पेट्रोल आणि १४ हजार लीटर डिझेल, तर एमएच-०४ एलवाय-६३८८ या टँकरमध्ये २९ हजार लीटर विमान इंधन (एटीएफ) असल्याचे आढळून आले.कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल व (एटीएफ) इंधनासह संबंधित टँकर आणि अन्य साहित्य असा एकूण १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, उपनियंत्रक माधुरी शिंदे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप अधिकारी गणेश पवार, सहायक शिधावाटप अधिकारी योगेश्वर मोरे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, राहुल इंगळे आणि अरुण काते यांनी केली.प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने