Labour Minister Adv. Akash Fundkar : नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे

मुंबई: बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमल बजावणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून सहभागी अधिकारी हे केवळ प्रशिक्षणार्थी न राहता ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून उदयास यावेत आणि कामगार विभागातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत नवीन कामगार कायद्यांचे ज्ञान पोहोचवावे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.


परळ येथील ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित ‘नवीन कामगार संहिता आणि कामगार कायद्यातील बदल’ या विषयावरील चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मंत्री ॲड. फुंडकर बोलत होते.प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, कामगार विभाग हा शासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. कामगारांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि उद्योगांच्या प्रगतीसाठी विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेने आणि कार्यक्षमतेने पार पाडाव्यात. नवीन कामगार संहितांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांचा लाभ कामगार आणि उद्योग या दोन्ही घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.


संस्थेच्या संचालक रोशनी कदम - पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करुन अधिकारी वर्गाची भूमिका विषद केली. राज्यातील विविध विभागांतून आलेले कामगार विभागाचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नवीन कामगार संहितांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित अधिकारी वर्ग हीच खरी ताकद असल्याचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला. प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने करण्यात आले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने