Crime News : चारित्र्यावर संशयातून 17 वर्षीय मैत्रिणीचा खून; वडिलांच्या मदतीने जंगलात नेऊन मृतदेह जाळला

Crime News :श्रीगोंद्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत अवघ्या17 वर्षीय मैत्रिणीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीची हत्या तिच्याच प्रियकराने केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. त्यानंतर मुलाने वडिलांच्या मदतीने जंगलात नेऊन मृतदेह जाळला. याप्रकरणी एका तरुणासह त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या माहितीनुसार, शुभम सुखदेव ओव्हाळ आणि मृत अल्पवयीन तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 15 जून रोजी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या शुभमने लोखंडी रॉड आणि फरशीच्या तुकड्याने तरुणीच्या डोक्यावर वार करत तिची हत्या केली. हल्ला इतका गंभीर होता की तरुणीचा जागीच मृत्यू झाला.



जंगलात नेऊन मृतदेह जाळला


खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह गादीत गुंडाळून लपवून ठेवला आणि केडगाव येथे जाऊन घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुभम आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनी मृतदेह दुचाकीवरून वडाळी रस्त्यालगतच्या जंगलात नेला. तेथे लाकूडफाटा गोळा करून मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्यात आले. मृतदेह पूर्णपणे जळेपर्यंत दोघे घटनास्थळी थांबून होते आणि पहाटे घरी परतले.



दरम्यान, शुभमने हा प्रकार आपल्या एका मित्राला सांगितला होता. सुरुवातीला मित्राचा विश्वास बसला नाही. मात्र आरोपीने व्हिडिओ कॉलद्वारे खुनाचा पुरावा दाखवल्यानंतर मित्राने नगर येथील पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शुभम आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले.


धक्कादायक म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीही संबंधित तरुणीने शुभमविरोधात मारहाणीची तक्रार केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप तरुणीच्या आईने केला आहे. वेळेत कारवाई झाली असती तर आपल्या मुलीचा जीव वाचला असता, अशी हळहळ तिने व्यक्त केली आहे.


दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे करत आहेत.

Comments
Add Comment

ITBP स्थापना दिन : पंतप्रधान मोदींकडून ‘हिमवीरांना’ सलाम ! भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या शौर्याचे केले कौतुक

नवी दिल्ली : भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (ITBP) ६५ व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी,

Borivali Hospital : बोरिवलीतील 'श्री हरीलाल भगवती मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल'ची सुविधा लवकरच उपलब्ध होणार

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने  बोरीवली (पश्चिम) येथील श्री हरीलाल भगवती हॉस्पिटलची पुनर्रचना

Mumbai Garbage News : वारंवार कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करा, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे ओळखून त्यांचे नकाशांकन करणे, त्यावर सीसीटीव्ही

BMC News : मुंबई बाहेर सर्व आरएमसी प्लांट न्या, वाढत्या प्रदुषणामुळे महापौरांनी दिले प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील वाढत्या प्रदुषणाबाबत महापालिका सभागृहात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यावर

फटाक्यांबाबत शाळांमधील मुलांमधून जनजागृती, महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत सण-उत्सवांच्या काळात होणारे वायू व ध्वनिप्रदूषण कमी करण्यासह पर्यावरण

OTP Safety : OTP बाबत TRAI मोठा बदल करण्याच्या तयारीत? आता कोड पाहण्यासाठी उघडावे लागणार मेसेजेस ॲप!

Technology News: मोबाईलवर ओटीपी (OTP) आल्यावर अनेक जण संपूर्ण संदेश न वाचता केवळ नोटिफिकेशनमधील कोड पाहून पुढील प्रक्रिया