Minister Aditi Tatkare : बालकांना पोषणासह चविष्ट आहार

घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश


मुंबई : अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री तटकरे यांनी स्वतः पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी केली.(PM Kisan Yojana)


बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव वी. आर. ठाकूर, अवर सचिव सुनील सरदार, प्रसाद कुलकर्णी, सह आयुक्त वर्षा पवार, उपायुक्त संगीता लोंढे, विजय क्षीरसागर, जामसिंग गिरासे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या निकषानुसार सध्या घरपोच आहार प्रीमिक्स स्वरूपात वितरित केला जातो. मात्र, लाभार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सूचना तसेच तज्ज्ञांच्या शिफारशी लक्षात घेऊन या आहारामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.सध्याच्या ‘एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्स’मधील घटकांच्या मिश्रणात सुधारणा करण्यात आली असून आहाराचा दर्जा अधिक चांगला राखण्यासाठी मसाल्याचे पाकीट स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय ‘मल्टी मिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स’ ही पाककृती कायम ठेवण्यात आली आहे. तसेच ‘व्हेज पुलाव’ आणि ‘मल्टीग्रेन पफ’ या दोन नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे..(PM Kisan Yojana)


या बदलांमुळे लाभार्थ्यांना आता अधिक पौष्टिक आणि रुचकर पाककृतींचा घरपोच आहार उपलब्ध होणार आहे. सर्व पाककृतींमध्ये केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या प्रमाणात उष्मांक, प्रथिने आणि आवश्यक सूक्ष्म पोषकतत्त्वांचा (मायक्रोन्यूट्रिएंट्स) समावेश करण्यात आला आहे.राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी शासन सातत्याने विविध उपाययोजना राबवत असून मागील तीन वर्षांत कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पाककृतींमुळे लाभार्थ्यांची आहाराबाबतची स्वीकृती वाढेल आणि कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आहाराबाबत माहिती देताना डॉ. अनुपकुमार यादव म्हणाले की, आहारामध्ये बदल करण्यापूर्वी राज्यभर सर्वेक्षण करण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ज्ञ आणि विविध विशेषज्ञ संस्थांची मते जाणून घेण्यात आली. क्षेत्रीय यंत्रणांशी झालेल्या चर्चेदरम्यान या नवीन पाककृतींना लाभार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल..(PM Kisan Yojana)

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी