Nashik unauthorized encroachment : सारडा सर्कलनंतर आता भद्रकाली, दूध बाजार आणि फाळके रोड परिसर प्रशासनाच्या रडारवर

Nashik unauthorized encroachment : नाशिक शहरातील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली असून शुक्रवार (दि. १९) पासून व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात फाळके रोड, दूध बाजार आणि भद्रकाली परिसरातून होणार असून जेसीबीच्या सहाय्याने नियमबाह्य बांधकामे व अतिक्रमणे हटवली जाणार आहेत.


या कारवाईसाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त मंजूर झाला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या उपस्थितीत मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.



विशेष म्हणजे, भद्रकाली परिसरातील २२ मोठ्या व्यावसायिक आस्थापनांना आणि दुकानदारांना महापालिकेकडून अंतिम नोटीस देण्यात आली आहे. नोटीसची मुदत संपल्यानंतर संबंधित अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी सारडा सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर आता महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या व्यावसायिक भागांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


'शहरातील प्रमुख आणि गर्दीच्या भागांमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्व संबंधितांना कायदेशीर नोटिसा देण्यात आल्या असून नियमबाह्य अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत,' अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''