UBT Faction : बंडखोर खासदारांनी उबाठाचा ‘व्हीप’ झुगारला

कारणे दाखवा नोटीस जारी; शिवसेनेच्या वर्धापनदिनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

मुंबई : उबाठाच्या ६ बंडखोर खासदारांपैकी दोघेजण माघारी फिरतील, असा दावा केला जात असतानाच, सर्व बंडोबांनी व्हीप झुगारत गुरुवारी संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे उबाठामधील फुटीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. या सर्व बंडखोरांना उबाठाने 'कारणे दाखवा नोटीस' जारी केली असून, त्यांना उत्तर देण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. दुसरीकडे, हे सर्व बंडखोर दिल्ली-जयपूर वारी करून मुंबईत दाखल होणार आहेत. गोरेगावच्या 'वेस्टीन हॉटेल'मध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली असून, शुक्रवारी नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.(FIFA WORLDCUP 2026)


संसदेतील उबाठा गटाच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत हे चारच खासदार उपस्थित होते. व्हीप बजावूनही ६ खासदारांनी बैठकीकडे पूर्णपणे पाठ फिरवली. त्यात संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), संजय दिना पाटील (मुंबई ईशान्य), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) यांचा समावेश आहे. "व्हीप बजावूनही बैठकीला गैरहजर राहणे हा पक्षद्रोह आहे. त्यामुळे या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. ७ दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल," असा इशारा अरविंद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिला.


या बंडखोर खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी उबाठा गट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे कायदेशीर दाद मागणार आहे. यासाठी त्यांनी शरद यादव यांच्यावरील कारवाईचा दाखला दिला आहे. शरद यादव यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर भाषण केले होते, तेव्हा पक्षाच्या तक्रारीवरून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. "जर या सहा जणांनी वेगळा गट स्थापन केला असेल, तर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेले पत्र जाहीर करावे. चोरी करणारे आपली चोरी का लपवत आहेत?" असा सवाल सावंत यांनी केला.(FIFA WORLDCUP 2026)


गोरेगावच्या 'वेस्टीन हॉटेल'मध्ये सोय

या सर्व घडामोडी सुरू असताना बंडखोर खासदार नेमके कुठे आहेत, यावरून गुरुवारी दिवसभर तर्कवितर्क सुरू होते. उबाठा खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता की, या ६ खासदारांचे मनपरिवर्तन रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ३० मिनिटांच्या 'कॉन्फरन्स कॉल'वर चर्चा झाल्यानंतर त्यांना दिल्लीतून राजस्थानच्या जयपूरला हलवण्यात आले होते. आता हे सर्व बंडखोर खासदार जयपूरहून मुंबईत दाखल होत आहेत. गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या प्रसिद्ध 'वेस्टीन हॉटेल'मध्ये त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली आहे.(FIFA WORLDCUP 2026)



वर्धापनदिन सोहळ्यात पक्षप्रवेश?

शुक्रवार, १९ जून रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. हे कार्यक्रमस्थळ आणि बंडखोर खासदार थांबलेले 'वेस्टीन हॉटेल' अगदी शेजारी-शेजारी असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्व नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात हे ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असून, या गटाचे नेतृत्व खासदार संजय जाधव यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, उबाठा गटाने दिलेल्या इशाऱ्यांनंतर मुंबईत आणि राज्याच्या विविध भागांत आंदोलन होण्याची शक्यता आहे. अशावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानासह सर्व ६ बंडखोर खासदारांच्या घराबाहेर स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.