Vaibhav Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीवर कारवाई होणार? बीसीसीआयने दिली मोठी अपडेट !

मुंबई : भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryvanshi) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील सामन्यानंतर मैदानावर झालेल्या वादामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या प्रकरणावर बीसीसीआयने भूमिका स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. सामन्यानंतर श्रीलंकेच्या काही खेळाडूंशी झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूप धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले होते. सुपर ओव्हरमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर हा प्रकार घडला. मात्र, पंच आणि इतर खेळाडूंनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.(Telagana T20 League)


बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या प्रकरणावर भाष्य करत सांगितले की, ही स्पर्धा श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अखत्यारित येते. त्यामुळे या घटनेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बीसीसीआय किंवा आयसीसीकडे नसून, तो मॅच रेफरी आणि पंचांकडे आहे.सैकिया म्हणाले,मैदानावर घडलेल्या घटना या खेळाचा एक भाग असतात. या प्रकरणात बीसीसीआयची कोणतीही भूमिका नाही.


वैभवसाठी बीसीसीआयचा विशेष निर्णय


१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची आयर्लंड आणि इंग्लंड (England) दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघात निवड झाली आहे. त्याचे वय लक्षात घेता बीसीसीआयने (Bcci) विशेष निर्णय घेत त्याच्या आई-वडिलांनाही दौऱ्यावर सोबत पाठवण्याचे ठरवले आहे. सैकिया यांनी सांगितले की, वैभव संघातील इतर खेळाडूंपेक्षा खूप लहान आहे. त्याला मानसिकदृष्ट्या कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्याच्या पालकांनाही सोबत पाठवले जाईल. त्यांचा संपूर्ण खर्च बीसीसीआय उचलणार आहे.


तिरंगा मालिकेत फ्लॉप !


वैभव सूर्यवंशीची बॅट तिरंगी मालिकेत अद्याप अपेक्षेप्रमाणे तळपलेली नाही.त्याने चार वनडे सामन्यांत ११७ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १५३.९४ इतका आहे. आता अंतिम सामन्यात त्याच्याकडे मोठी खेळी करून टीकाकारांना उत्तर देण्याची सुवर्णसंधी असेल. वैभवकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, अंतिम सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम