Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन (Udaiti Foundation) यांच्यात याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात ‘महिला उद्योजकता स्टार्ट अप’ हब स्थापन होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सांगितले.मुख्मंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या कराराअंतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन तांत्रिक व ज्ञान भागीदार म्हणून कार्य करणार आहे. महिलांना उद्योजकांना वित्तपुरवठा, बाजारपेठ व व्यवसाय सहाय्यदेखील मिळवून देण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी यामुळे चालना मिळणार असून महिला उद्योजकांच्यादृष्टीने उत्साही वातावरण तयार होण्यास मदत होईल.


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हा सामंजस्य करार झाला आहे. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील आणि उदैती फाउंडेशनच्या संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा शर्मा गोयल यांनी या करारावर स्वाक्षरी केली.महिला उद्योजकता स्टार्ट अप हब राज्यातील स्टार्ट अप परिसंस्थेमध्ये समन्वय साधणारे व्यासपीठ म्हणून काम करेल. शासनाच्या विविध विभाग, परिसंस्था भागीदार आणि सहाय्यक संस्थांना एकत्र आणून महिला उद्योजकांसाठी संधींचे मार्ग अधिक सक्षम करण्याचे काम या हबद्वारे केले जाईल. महाराष्ट्रातील महिला-नेतृत्वाखालील उद्योगांसाठी ‘अ‍ॅक्सेलरेटर मॉडेल’ तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अ‍ॅक्सेलरेटरच्या माध्यमातून मार्गदर्शन, उद्योग क्षेत्राची गरज, वित्तपुरवठ्याची उपलब्धता, बाजारपेठीय दुवे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांशी समन्वय साधून उदैती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीला तांत्रिक सहाय्यही देणार आहे.




राज्यासाठी महिला स्टार्ट अप निर्देशांक विकसित करून त्याचे संस्थात्मकीकरण करण्यावरदेखील भर दिला जाणार आहे. निर्देशांकाच्या माध्यमातून महिला उद्योजकतेच्या प्रगतीचा आढावा विविध विभाग व जिल्हानिहाय लिंग-विभागित आकडेवारीच्या आधारे घेता येईल. या उपक्रमामुळे पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती अधिक बळकट होईल, विभागांमधील समन्वय अधिक सुलभ होईल. शासनाचे विविध विभाग व जिल्ह्यांतील कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी ‘गव्हर्नन्स डॅशबोर्ड’ विकसित करण्यात येणार आहे, ज्यामुळे वेळोवेळी आढावा घेऊन आकडेवारीवर आधारित निर्णयप्रक्रिया सुलभ होईल; तसेच ‘वुई इंडेक्स’च्या अंमलबजावणीस मार्गदर्शन करण्यासाठी आणि शासनातील विविध संस्थांमधील समन्वय मजबूत करण्यासाठी आंतरविभागीय संचालन समिती स्थापन करण्यासही या भागीदारीतून मदत होणार आहे.


उदैती फाउंडेशन

उदैती फाउंडेशन भारतातील महिलांच्या उद्योग क्षेत्रात सहभागाला गती देण्यासाठी कार्यरत आहे. राज्य शासन आणि खासगी क्षेत्रातील उद्योगांसोबत सहकार्य करत १५६ दशलक्ष रोजगारक्षम; परंतु सध्या बेरोजगार असलेल्या महिलांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट या संस्थेचे आहे. महिलांना रोजगार मिळविण्यात येणारे अडथळे दूर करणे, महिला उद्योजकांना रोजगार देणारे बनण्यासाठी उद्योजकता परिसंस्था मजबूत करणे यावर भर देण्यात येणार आहे. निवास आणि बालसंगोपन यांसारख्या महत्त्वाच्या सुविधांना बळकटी दिली जाणार आहे. यातून ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय दृष्टिकोनाला गती देण्यास हातभार लाभेल.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या