BMC : नाना शंकर शेठ यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसे स्मारक उभारा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक म्हणून ओळख असलेल्या नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ (Jagannath (Nana) Shankarseth) यांच्या स्मारक (Memorial) उभारणीच्या कामाच्या प्रस्तावाला अखेर स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आले.मात्र, हेस्मारक बनवताना नानांच्या नावाला साजेसे असे स्मारक बनवण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी केली.



एफ/उत्तर विभागातील भु.क्र. ३/३५७ (भाग), माटुंगा विभागाच्या हद्दीतील जागेवर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. ही जागा सुधार व महापालिकेच्या मंजुरीने नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ प्रतिष्ठानला देण्यात आली असून येथे अत्याधुनिक शैक्षणिक इमारत, संशोधन केंद्र तसेच नाना शंकरसेठ यांच्या कार्याला उजाळा देणारे स्मारक उभारण्यात येणार आहे. भूखंड प्राप्त झाल्यानंतर या स्मारक वास्तूचे बांधकाम कुणी करावे यावरून सुरु असलेला पेच सुरु होता. याचा खर्च आता महापालिकेच्यावतीने केला जात आहे.१७ विविध प्रकारची या कामांसाठी प्रशासनाने सुमारे १२ कोटी रुपये अंदाजित किंमत निश्चित केली होती. यामध्ये उणे २१ टक्के दराने हिराणी एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली आहे. ९.४४ कोटी रुपये आणि विविध करांसह १४.०४ कोटी रुपये यावर खर्च केले जाणार आहेत.


याबाबतचा प्रस्ताव आला असता उबाठाचे यशोधर फणसे यांनी नाना शंकरशेठ यांचे स्मारक त्यांच्या कामाला साजेसे व्हावे. त्यांनी ज्याप्रकारे मुंबईत वास्तू उभारल्या आहेत.ते पाहण्यासाठी पर्यटक येत असतात,तसेच हे स्मारक असावे अशी मागणी केली. तसेच काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी स्मारकाची वास्तू खूप आकर्षक बनावे,अशी मागणी केली. तर अमेय घोले यांनी हे स्मारक आयकॉनिक व्हावी तसेच याचे सभागृहात सादरीकरण व्हावे अशी मागणी केली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावाल मंजुरी देताना नानांचे मुंबईवर अनंत उपकार असून त्यांच्यासारखा दाता आज अस्तित्वात राहिलेला नाही.



मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नानांचे नाव द्यावे


नानांचे स्मारक उभारण्याचा हा प्रस्ताव असून याचे अभिनंदन सर्वच सदस्यांनी केले आहे. त्यामुळे नानांचे हे स्मारक उभारतानाच मुंबई सेट्रल रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याची मागणी त्यांचे कुटुंब आणि प्रतिष्ठानच्यावतीने केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने रेल्वेला पत्र लिहून या स्थानकाला नाव देण्याचा प्रयत्न केला जावा अशी सूचना केली.

Comments
Add Comment

MSRTC Extra Buses for Ganesh festival : गणपतीसाठी कोकणवारीची लगबग; MSRTCच्या ५,२२० जादा बसेस प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : गणेशोत्सव जवळ येताच मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांची गावाकडे जाण्यासाठी मोठी लगबग

Sunetra Pawar : केंद्राच्या धर्तीवर राज्यातील साखर कारखान्यांसाठी येणार 'सॉफ्ट लोन योजना'

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश; साखर कारखान्यांमधून तयार होणाऱ्या उपपदार्थांसाठी स्वतंत्र धोरण

Devendra Fadnavis : महाराष्ट्र लँडबँकमुळे पायाभूत सुविधाच्या विकासाला गतिमानता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महसूल, वन आणि जमाबंदी विभागाचा एकिकृत डॅशबोर्ड https://www.prahaar.in/2026/09/02/nashik-crime-news-police-raid-in-waghadi-100-grams-of-md-worth-3-lakh-seized/ मुंबई : महाराष्ट्र

Beed-Pune Railway : मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी धावणार बहुप्रतिक्षित 'बीड-पुणे' रेल्वे

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा; डिसेंबरमध्ये बीडला मुंबईशी जोडणी मुंबई : बहुप्रतिक्षित

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूचा तपास आता 'सीबीआयकडे'

- उच्च न्यायालयाचा आदेश; पोलिसांचा सहा वर्षांचा तपास अपुरा, गुन्हा नोंदवून सर्व पैलूंचा तपास करण्याचे

MPSC Drug Inspector Exam Paper Leak : औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर मार्चमध्ये नव्हे, जानेवारीतच फुटला!

- एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे स्पष्टीकरण; पेपर फुटीप्रकरणी वैयक्तिक आरोपांवर मांडली भूमिका मुंबई :