Indian Womens Team : श्रेयंका पाटीलच्या जागी प्रेमा रावतला संधी ! WPL मध्ये फक्त सहा सामने आणि थेट वर्ल्ड कप मध्ये एन्ट्री !

मुंबई : टी-२० विश्वचषक(T20 world cup 2026 )स्पर्धेदरम्यान भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तिच्या जागी एका बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. नवख्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण न केलेल्या प्रेमा रावतचा टी-२० विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रेमाने आतापर्यंत केवळ सहा आयपीएल सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यामुळे तिच्या निवडीवर चर्चा सुरू झाल्या आहेत.



आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने श्रेयंका पाटीलच्या जागी लेग-स्पिनर प्रेमा रावतला भारतीय संघात घेण्यास परवानगी दिली आहे. प्रेमा याआधी भारत अ संघासोबत इंग्लंडमध्ये होती. ती आता वरिष्ठ संघासोबत विश्वचषकात भाग घेणार आहे.





फक्त सहा सामन्याचा अनुभव !


प्रेमा रावत (Prema Rawat) २४ वर्षांची आहे. अद्याप भारतीय संघात तिने पदर्पण केलेले नाही. तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. प्रेमा रावतने आयपीएलच्या दोन हंगामात भाग घेतला आहे. तिने २०२४-२०२५ आणि २०२५-२०२६ असे दोन हंगाम मिळून सहा सामने खेळले आहेत. या सहा सामन्यात तिने २०.३३ च्या सरासरीने सहा विकेट्स घेतल्या आहेत. फक्त सहा सामन्यानंतर थेट वर्ल्ड कप संघात निवड झाल्याने क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे.



आयसीसीचे अधिकृत निवेदन


श्रेयंका पाटीलच्या जागी पर्यायी खेळाडूचा समावेश करण्यास मंजुरी देणारे अधिकृत निवेदन आयसीसीने जारी केले आहे. त्यात आयसीसीने सांगितले आहे की, महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या तांत्रिक समितीने श्रेयंका पाटीलच्या जागी भारतीय संघात प्रेमा रावतचा समावेश करण्यास परवानगी दिली आहे. बुधवारी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयांकाच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली असून, तिच्या जागी प्रेमा रावतची संघात निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून