Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट


मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्र (Regional Meteorological Centre - RMC) ला नुकतीच भेट दिली.



यावेळी हवामान खात्याचे तज्ज्ञ बिक्रम सिंग यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा दिला. त्यानंतर डॉ. नायर, सौ. निथा, डॉ. जिस्मी आणि योगेश यांच्यासोबत जय पवार यांनी सखोल चर्चा केली.




या चर्चेदरम्यान पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबामागील विविध कारणांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. यामध्ये एल निनो (El Niño) चा संभाव्य प्रभाव तसेच इतर महत्त्वाच्या हवामानविषयक घटकांवर चर्चा झाली. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सुमारे २५ जूनच्या आसपास पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. राज्यातील शेतकरी वर्ग पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पावसाच्या विलंबाचा जलसाठे, शेती क्षेत्र आणि सर्वसामान्य जनजीवनावर थेट परिणाम होत असल्याने, या परिस्थितीचा अचूक आढावा घेणे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा जय पवार यांच्या या भेटीचा मुख्य उद्देश होता.



राज्यात पाऊस पूर्णपणे सक्रिय होऊन समाधानकारक आणि सातत्यपूर्ण सुरू होईपर्यंत पेरणीसाठी घाई करू नका. घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करूनच पुढील निर्णय घ्या असे आवाहन जय पवार यांनी शेतकऱ्यांना केले.


दरम्यान पाऊस नियमित सुरू होत नाही तोपर्यंत जय पवार हे प्रादेशिक हवामान केंद्राशी संपर्कात राहून पावसाच्या प्रगतीविषयीची अचूक व अद्ययावत माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून