Nashik Crime : सुटकेसमधील 'त्या' महिलेची हत्या कोणी आणि का केली ? अखेर सत्य समोर ; संशयित ताब्यात

Nashik Crime : नाशिक शहरातील तपोवनात बेवारस स्थितीत एक सुटकेस आढळली होती. ज्यात एका महिलेचा मृतदेह होता. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. मंगळवारी (दि. १६) सकाळी तपोवनातील केवडीबन कृषी गो सेवा शाळेच्या समोर रस्त्याच्या पलीकडे सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून, सुनीता विश्वकर्मा असे खून झालेल्या त्या मृत महिलेचे नाव आहे. ती उपनगर परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.


प्लंबर असलेल्या गोपीनाथ गोसावी (४०) याच्यासोबत सुनीता विश्वकर्मा ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. प्रियकराबरोबर वाद झाल्याने त्यातून त्याने दारूच्या नशेत सुनीताचा तोंड, नाक, गळा दाबून तिचा खून केला. गोपीनाथ गोसावी याला कर्नाटक राज्यातील मंगरूळमधून आडगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली.



नेमकं काय घडलं ?


उपनगर परिसरात राहणाऱ्या गोपीनाथ गोसावीचा प्लंबिंग व्यवसाय असून, त्याचे मूळ उत्तर प्रदेश व मागील अनेक वर्षांपासून उपनगरला राहणाऱ्या धुणी भांडी करणाऱ्या सुनीता विश्वकर्मा महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मयत सुनीता ही स्वतः विवाहित होतीमात्र तिला पतीने सोडल्याने ती काही वर्षांपासून विवाहित असलेल्या गोसावीच्या समवेत त्याच्या घरी एकत्र राहत होती.


गेल्या शनिवारी (दि.१३) रात्री गोसावी याची पत्नी तसेच प्रेयसी सुनीता घरी असताना दोघांमध्ये काहीतरी शाब्दिक वाद झाले. त्यातून मद्यपान केलेल्या गोपीनाथने सुनीताला शिवीगाळ करत एक चापट मारली. सुनीता खाली पडताच दारूच्या नशेत असलेल्या गोपीनाथने तिचे नाक, तोंड व गळा दाबला. श्वास गुदमरल्याचे लक्षात येताच आणि सुनीता निपचिप पडल्याचे बघून गोपीनाथने प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह बांधत गोणी सुटकेसमध्ये टाकत सुटकेस तशीच घरात ठेवली.



मृतदेह एक दिवस घरातच


लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रेयसी सुनीताचा खून केल्यानंतर प्रियकर गोपीनाथने मृतदेह भरलेली सुटकेस एक दिवस घरात ठेवली. रविवारी रात्री संधी मिळताच मृतदेह असलेली सुटकेस स्कुटीवरून तपोवन कृषी गो सेवा शाळेसमोर रस्त्याच्या कडेला फेकून दिली होती.



प्रेयसीचा खून केला अन् सासूरवाडीला पळाला


लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या गोपीनाथने प्रेयसी सुनीताचा खून केल्यावर सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून सुटकेस तपोवनात फेकून रात्रीतूनच पत्नीसह कर्नाटकला मंगरूळला सासूरवाडीला पळून जाण्याचा डाव आखला. आपला बोजा बिस्तार आवरून तो कर्नाटकला पोहोचला.



संशयित सासूरवाडीला गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांना मिळताच कर्नाटकला रवाना केलेल्या आडगाव पोलिस पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. प्रेयसी व प्रियकर यांच्यात एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या कारणावरून किंवा इतर वाद निर्माण होऊन त्यातून खून केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.


मंगळवारी सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्यानंतर आडगाव पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी वेगाने तपास चक्रे फिरवत पुरावा शोधण्याचे काम सुरू केले होते. आडगाव पोलिसांना या खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यास यश आले असून, शुक्रवारी पोलिस संशयिताला नाशिकला आणण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण