Navnath Ban : संजय राऊतांनी औरंगजेबाचा इतिहास सांगायला हवा

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात


MUMBAI : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यापेक्षा संजय राऊत यांनी ते ज्या औरंगजेबाचा वैचारिक वारसा चालवताहेत त्या औरंजेबाचा इतिहास सांगायला हवा. शिवाजी महाराजांचा इतिहास हा स्वाभिमानाचा आणि विचार हिंदुत्वाचे होते. तुमचा इतिहास हा औरंगजेबाच्या चरणावर आपला पक्ष अर्पण करण्याचा आणि अफझलखानाच्या कबरीवर माथा टेकण्याचा आहे. सातत्याने औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याने तुम्हाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.




वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे साठ वर्षे टिकलेली मूळ शिवसेना ही एकनाथजी शिंदेंसोबत आहे. कारण ते बाळासाहेब ठाकरेंचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानतात. तुमच्यासारखे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून औरंगजेबाचा उदो उदो करत नाहीत, राम मंदिरांवर टीका करत नाहीत. आज मूळ शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, उबाठा गटाचा नव्हे. उबाठा गटाचा वर्धापन दिन उबाठा गट स्थापन झाला त्यादिवशी असल्याने संजय राऊतांनी एकदा उबाठा गटाची कुंडली शोधावी. मूळ शिवसेनेवर महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. त्या जन्मकुंडलीत राहुल गांधी हे सर्वात मोठे शिलेदार असल्याने राहुल गांधींना विचारून उबाठाने आपला वर्धापन दिन साजरा करावा, असे श्री. बन यांनी सुचवले.



सगळ्यात मोठा बाजार 2019 साली संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackarey)यांनी मांडला होता. बाजारात उभे राहून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी अख्खा पक्ष, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्व आणि साठ वर्षांची शिवसेना विकून टाकली. आपण स्वतः आपल्या पक्षाचा लिलाव करायचा आणि विचारांना विकले गेले म्हणायचे, हे धंदे संजय राऊतांनी बंद करावेत. आपल्या पक्षाचा लिलाव करताना किती कोटी घेतले होते, याचे उत्तर आधी संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावे, असे  बन यांनी सुनावले.गिरीशजी महाजन यांनी भाजपा सोडून जावे यासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न केले होते, याची आठवण करून देत श्री. बन म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांच्याविरोधात 'मकोका'अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी रचलेल्या षडयंत्राचा भांडाफोड तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला होता. तुमच्या त्या षडयंत्राला कधी यश आले नाही. संजय राऊत, अर्धा तास काय, अडीच वर्षे तुमच्याकडे सत्ता दिली तरी भाजपाचा साधा कार्यकर्ताही तुम्ही फोडू शकला नाहीत. आमच्याकडे ईडी द्या, सीबीआय द्या, अशा गप्पा करताय. ती तुमची औकात नाहीय. कारण ईडी - सीबीआयच्या माध्यमातून पक्ष फुटत असते तर काँग्रेसचे राज्य कायमचे टिकले असते एवढा ईडी आणि सीबीआयचा गैरवापर काँग्रेसने (Congress) केलेला आहे.



संजय राऊत (Sanjay Raut), तुम्ही भांडुपमध्ये ज्या वार्डात राहता तिथे वर्षानुवर्ष भाजपाचा नगरसेवक निवडून येतोय. आपण राहात असलेल्या वार्डात तुमच्या उबाठा गटाचा नगरसेवक निवडून आणता येत नाही आणि तुम्ही निघाले भाजपाचे साठ तुकडे करायला. आधी आपला वॉर्ड सांभाळा आणि मगच भाजपाचे तुकडे करण्याचे स्वप्न पहा अशा शब्दात श्री. बन यांनी चांगलीच निर्भत्सना केली.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने