Indian Womens Hockey Team :भारतीय महिला हॉकी संघाची दमदार कामगिरी;चिलीला हरवत नेशन्स कॅपच्या अंतिम फेरीत धडक

मुंबई : हॉकीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय महिला हॉकी संघाने शनिवार २० जून रोजी ऑकलंड येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चिलीला पराभूत करून एफआयएच हॉकी महिला नेशन्स कप २०२५-२०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने चिलीवर ६-० असा एकतर्फी विजय मिळवला. भारतीय महिला संघ या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही. त्यामुळे, अंतिम फेरीत त्यांचा विजयाची शक्यता जास्त आहे.



भारताचे चिलीवर वर्चस्व


उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच चिलीवर दबाव टाकला आणि त्यांना पुनरागमन करू दिले नाही. संघाला सहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि याचा फायदा घेत नवनीतने गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, १३ व्या मिनिटाला नवनीतने पुन्हा गोल केला. १४ व्या मिनिटाला ड्रॅगफ्लिकर दीपिकाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताची आघाडी आणखी वाढवली आणि १८ व्या मिनिटाला तिने पुन्हा एकदा गोल करून स्कोअर ४-० असा केला. भारतासाठी नेहा आणि रितुजा यांनीही गोल केले. कर्णधार सलीमा टेटेला तिच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.भारताच्या दीपिकाने या सामन्यात दोन गोल केले असून ती स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारी खेळाडू आहे. भारतीय संघाचा अंतिम सामना अमेरिका किंवा न्यूझीलंड यांच्यापैकी एका संघाविरुद्ध होऊ शकतो.



भारतीय संघाची नेशन्स कपमधील दमदार कामगिरी

न्यूझीलंडमधील ऑकलंड (Auckland, New Zealand) येथे झालेल्या 'FIH हॉकी महिला नेशन्स कप २०२५-२६' मध्ये कर्णधार सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने अजिंक्य राहून अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाने 'पूल ए' मध्ये अमेरिकेचा ३-२, जपानचा २-१ आणि उरुग्वेचा ३-२ असा पराभव करून साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले आणि त्यानंतर उपांत्य फेरीत चिलीचा ६-० असा धुव्वा उडवला. संपूर्ण स्पर्धेत ४ सलग सामने जिंकत भारताने एकूण १४ गोल केले तर केवळ ५ गोल स्वीकारले, ज्यामध्ये स्टार खेळाडू दीपिकाने उरुग्वेविरुद्ध केलेले महत्त्वपूर्ण दोन गोल आणि आक्रमक कामगिरी विशेष ठरली. याशिवाय, मध्यरक्षक ज्योतीने जपानविरुद्ध आपला १०० वा आणि नेहाने उरुग्वेविरुद्ध आपला २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला.




Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून