Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात एका युवकाचा जीव अक्षरशः 'वाचला'. लघुशंकेसाठी थांबलेला असताना अचानक तोल जाऊन २०० फूट खोल दरीत कोसळलेल्या युवकाला स्थानिक ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमने मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले. या धाडसी मोहिमेची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात होत आहे.



नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एक युवक हॉटेलवर कामासाठी जात असताना आंबेनळी घाटातील मेटतळे धबधब्याजवळ लघुशंकेसाठी थांबला होता. यावेळी अंधार आणि पावसाळी वातावरणामुळे त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट २०० फूट खोल दरीत कोसळला. हा थरार काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीमला पाचारण केले.



असे राबविले धाडसी बचावकार्य


घटनेची तीव्रता लक्षात घेऊन रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वर पोलीस, प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी एकजुटीने 'रोप रेस्क्यू ऑपरेशन' सुरू केले. पावसाळी रात्र, अतिशय निसरडा परिसर आणि दाट अंधार अशा प्रतिकूल परिस्थितीत बचाव पथकातील सदस्यांनी जीवाची बाजी लावून दरीत उतरून जखमी युवकाचा शोध घेतला.


तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पथकाने युवकाला सुरक्षितरित्या वर काढले. त्याला तातडीने महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने तो शुद्धीवर असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



पथकांचे मोलाचे योगदान


या यशस्वी मोहिमेत प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामणे, संकेत सावंत, मुन्ना उतेकर, अवी उतेकर, आदेश मोरे, निखिल सावंत, अभी सपकाळ, रूपचंद मंडल, गणेश वागदरे, विक्रांत जाधव आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सोमनाथ वागदरे, सुजित कोळी, दीपक ओंबळे व श्रीकांत नावीलकर यांनी मोलाची कामगिरी बजावली.



सावधानतेचा इशारा: आंबेनळी घाट हा पावसाळ्यात अतिशय धोकादायक ठरतो. तीव्र वळणे आणि दऱ्यांमुळे पर्यटकांनी तसेच वाहनधारकांनी घाटात वावरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बचाव पथकांच्या तत्परतेमुळे एका तरुणाला 'नवजीवन' मिळाले असून, त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन

मुंबई: मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’चे

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत वेळेत द्या; ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी-चाऱ्याचे नियोजन करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या

महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे बजेट ५ हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य - मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला देशातील अग्रगण्य राज्यांच्या पंक्तीत आणण्यासाठी विभागाचे बजेट 212 कोटी

Devendra Fadnavis : 'महा कॅम्पा' निधीतून व्याघ्र प्रकल्पांतील गावांचे पुनर्वसन पूर्ण करा ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : व्याघ्र प्रकल्प आणि अन्य संरक्षित वनक्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची कामे महाराष्ट्र पर्यायी वनीकरण

Eknath Shinde : 'शेतकऱ्याला छळाल तर तुरुंगात पाठवू’; बँका, पतसंस्था, विमा कंपन्या, मायक्रो फायनान्स आणि सावकारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

नाशिक : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या बँका, पतसंस्था, विमा

राज्यातील दोन राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्रास वन्यजीव