नाशिक : शहरातील महात्मा नगर (Mahatma Nagar) परिसरातील कामगार नगर (Kamgar Nagar) भागात एका इमारतीच्या टेरेसवर (Terrace) पोत्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणाची हत्या (Murder) करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून टेरेसवर ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत होती. यामुळे स्थानिकांनी शोध घेतला असता रात्री उशिरा एका इमारतीच्या टेरेसवर पोत्यामध्ये मृतदेह असल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला.
मृतदेह एका तरुणाचा असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच परिसरातील एक तरुण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता (Missing) असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा मृतदेह त्या बेपत्ता तरुणाचा आहे की अन्य कोणाचा, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे पोलिसांनी आतापर्यंत तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून या प्रकरणातील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका तपासली जात आहे. हा धक्कादायक प्रकार सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून शवविच्छेदन (Postmortem) अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.





