Nashik : नाशिक शहरात उद्या यलो अलर्ट; नाशिककरांना दिलासा मिळणार ?

Nashik Rain Update : नाशिकककर अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. धरणांतील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे नाशिकरांवर पाणी टंचाई ओढवली आहे. याच कारणामुळे दर शनिवारी नाशिक शहरात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जिल्ह्यात देखील पाण्याचे संकट ओढवले आहे. शेतकरी आभाळाकडून डोळे लावून आहे. दरम्यान उद्या मंगळवारी नाशिकसह जिल्ह्याला दिलासा मिळू शकतो.



नाशिक शहरात उद्या यलो अलर्ट


नाशिक शहरासह जिल्ह्याला मंगळवारी (दि.२३) हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. यामुळे पाऊस दमदार हजेरी लावण्याची दाट शक्यता असून आतुरतेने वाट बघणाऱ्या नाशिककरांना दिलासा मिळू शकतो. ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहू शकतात आणि वीजांचा कडकडाटदेखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.



जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद


मान्सूनच्या वाटचालीकडे सर्वांचेच लक्ष असून बळीराजासह सर्वांसाठी ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील बहुतांश जलसाठे आटले असून पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. यामुळे मान्सून सरींच्या जोरदार वर्षावाची नाशिककर प्रतीक्षा अन् प्रार्थनाही करत आहेत. पाऊस लांबणीवर गेल्यामुळे जिल्ह्यात पेरण्याही खोळंबल्या असून खरीपाचा हंगामसुद्धा संकटात सापडला आहे.



यंदा 'एल-निनो' प्रणाली अधिक सक्रीय


यंदा प्रशांत महासागरात 'एल-निनो' प्रणाली अधिक सक्रीय झाल्याने पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तळ कोकणात अडकून पडलेल्या मान्सूनला पुढे सरकण्यास या प्रणालीमुळे अनुकूल असे वातावरण निर्माण होत नव्हते, यामुळे संपूर्ण राज्य व्यापण्यास मान्सूनला जूनचा अखेरचा आठवडा उजाडावा लागला आहे. मंगळवारपासून मान्सून सरी सर्वदूर कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरसारख्या घाटमाथ्यांच्या परिसरात मागील दोन दिवसांपासून सरींचा हलका ते मध्यम स्वरूपाचा वर्षाव सुरु झाला आहे.


दरम्यान, नाशिक शहराचे कमाल तापमान मागील दोन दिवसांपासून वाढले आहे. ३४अंशांपर्यंत खाली आलेला तापामानाचा पारा पुन्हा ३६ अंशांच्यापुढे स्थिरावत आहे. रविवारी सलग दुसऱ्यादिवशी कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस इतके मोजण्यात आले. यामुळे वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे.

Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र