Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ

- प्रताप सरनाईकांची विधानसभेत घोषणा; ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढ करणार



Pratap Sarnaik : मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या (ST) कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ जाहीर करण्यात आली. (Pratap Sarnaik)



याबाबत निवेदन करताना सरनाईक म्हणाले, “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मी नुकतीच सर्व युनियनची बैठक घेतली. एसटी ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. गेली ८ दशके शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला व ज्येष्ठ नागरीक, आदिवासी आणि दुर्गम भागातील लाखो नागरिकांना जोडून ठेवले आहे. या लालपरीचा खरा आधारस्तंभ म्हणजे एसटीचे कर्मचारी. उन्हाळा, पावसाळा असो वा इतर काहीही असो, या कर्मचाऱ्यांचे योगदान शब्दांत मांडणे कठीण आहे.



त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात येत आहे. त्याचबरोबर घरभाडे भत्ता ८-१६-२४ टक्क्यांवरून वरून १०-२० आणि ३० टक्के वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात कधी नव्हे तो एसटीचा संप भरकटला होता. आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलेली असताना आंदोलनापूर्वीच आम्ही त्यांना वेतनवाढ केली आहे”, असे सरनाईक यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळून सुमारे ५ हजार ६४९ कोटी रुपये अदा करण्यास शासन कटिबद्ध आहे”, असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक