Jalgaon Crime News : विहीर अनुदानासाठी हजारोंची लाच मागितली अन...

Crime News : सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी सरकार विविध योजना राबवत असते. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळीच मंडळी पुढे येते. आणि योजनेची मिळण्यासाठी काही रक्कम द्या म्हणून लाच मागते. असाच एक प्रकार जामनेर येथे घडला आहे. शासनाच्या विहीर अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर अशोक नावकर (३२) असे गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटी तांत्रिक सहाय्यकाचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची भावना व्यक्त होत आहे.



नेमकं प्रकरण काय ?


हा संपूर्ण प्रकार जामनेर (Jamner) येथे घडला आहे. तक्रारदार शेतकऱ्याची जामनेर तालुक्यात शेती आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत त्यांना विहिरीचे अनुदान मंजूर झाले होते. विहीर मंजुरीनंतर प्रत्यक्ष त्या जागेची पाहणी करायची त्यानंतर तांत्रिक अहवाल सादर करणे आणि अनुदानाच्या पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची ही जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाकडे होती. याचा फायदा सागर अशोक नावकरने उचलला.


आरोपानुसार, विहिरीच्या प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यापूर्वीच सागर नावकर (Sagar Navkar) यांनी ग्रामरोजगार सेवकाच्या माध्यमातून तक्रारदाराकडून तब्बल ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी विहिरीच्या जागेची पाहणी केली, छायाचित्रे घेतली आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले. या प्रक्रियेनंतर तक्रारदाराला पंचायत समितीमार्फत टप्प्याटप्प्याने ६० हजार ९६६ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.भस्मासुराप्रमाणे आरोपींची भूक काही मिटली नाही त्यांनी पुन्हा लाचेची मागणी केली.



पुन्हा ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी


उर्वरित अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदाराने पुन्हा तांत्रिक सहाय्यकाची भेट घेतली. त्यावेळी विहिरीची जागा बदलण्यात आल्याचे कारण पुढे करत पुढील अनुदान मंजूर करून देण्यासाठी आणखी ३० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली. संबंधित रक्कम दिल्याशिवाय उर्वरित अनुदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही असे तक्रारदाराला सांगण्यात आले. पैशांची पुन्हा व्यवस्था करणे शक्य नसल्याने तक्रारदाराने अखेर जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Bureau) धाव घेतली.


६ एप्रिल रोजी तक्रारदार शेतकऱ्याने अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची विभागानेही गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली. त्यानंतर नियमानुसार पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान पंचांसमक्ष तांत्रिक सहाय्यकाने उर्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पडताळणी अहवालाच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवत जामनेर पोलीस ठाण्यात (Jamner Police Station) सागर नावकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.



शासनाच्या योजनेत वाटा कशाला ?


या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित व्यवहार, अनुदान प्रक्रिया आणि यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान शासन खात्यातून वेतन सुरु असताना शासनाच्या योजनेत वाटा कशाला हवा हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पारदर्शक व सुलभ व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे योजनांबाबतचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म