Bhayandar Accident : भाईंदरमध्ये शाळेच्या बसला डंपरची धडक

भाईंदर : शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या घडली आहे. या अपघातात जीवितहानी झालेली नाही.





सिमेंट मिक्सर, माती वाहतूक करणारे डंपर निष्काळजीपणे चालवण्याचे प्रकार वाढत आहेत. यातूनच मीरा भाईंदरमध्ये अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. ताजी घटना मंगळवारची संध्याकाळची आहे. भाईंदर पूर्वेकडील पी.के. रोडवर एका भरधाव डंपरने शाळेच्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या पाठीमागील भाग संपूर्णपणे तुटला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये मोजकेच विद्यार्थी होते आणि ते गाडीच्या पुढील भागात बसले होते. यामुळे डंपरने मागून धडक दिल्यामुळे बसचे नुकसान झाले पण जीवितहानी झाली नाही. या निमित्ताने मीरा भाईंदरमधील वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीव आला आहे.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या