BMC News : मलनि:सारण वाहिन्यांसह प्रक्रिया केंद्रांच्या कामांसाठी १२ सल्लागार कंपन्यांचे पॅनेल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या हद्दीतील कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे टाकण्यासाठी व मलजल प्रक्रिया केंद्राची संकल्प चित्रे बनवणे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याकरिता सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी १२ सल्लागारांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. (BMC News)


मुंबईतील नागरिकांना १०० टक्के मलनिःसारण वाहिनीचे जाळे पुरवण्यासाठीमहापालिका वचनबद्ध आहे. सध्या मुंबईत महानगरपालिकेने २०८०.२७कि.मी. मलनिःसारण वाहिनीचे जाळे टाकलेले असून हे जाळे संपूर्ण मुंबईच्या ८५.७४ टक्के क्षेत्र आणि ८१.२८ टक्के लोकसंख्येला सेवा देते. मलनिःसारण प्रकल्प विभागाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मलनिःसारण वाहिनी नसलेल्या भागात मलनिःसारण वाहिनी टाकणे व पुरविणे. परंतु , मुंबईची भिन्न भौगोलिक स्थिती, भूगर्भीय स्तरातील अनिश्चितता, म्हाडाच्या वसाहती, उपलब्ध तांत्रिक कर्मचारी आणि माहितीसह मलनिःसारण वाहिनीच्या जाळ्यांची रचना करणे आणि टाकणे कठीण आहे. काही वेळा सीआरझेड तथा वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या मालकीच्या जमिनी किंवा महसूल विभागाच्या मालकीच्या जमिनींमध्ये मलनिःसारण वाहिनी टाकणे आवश्यक असते. (BMC News)


एमसीझेडएमए,वन विभाग, एमओईएफ इत्यादींकडून विशिष्ट ना-हरकत प्रमाणपत्र आणि विविध सरकारी विभाग यांच्याकडुन मंजुरी घेणे आवश्यक असते, ज्यासाठी सल्लागारा नियुक्ती करणे आवश्यक असते, असे या विभागाचे म्हणणे आहे. (BMC News)



मलनिःसारण प्रकल्प विभागात, विविध तलावांचे पुनरुज्जीवन, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील म्हाडा वसाहतींच्या सुधारित मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे यासारख्या सल्लागार सेवा पुरविण्याच्या कामांसाठी सल्लागारांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या आणि गोराई मनोरी बेटावर मलनिःसारण वाहिनीचे जाळ्यासह मलजल प्रक्रिया केंद्राचे नियोजन आणि बांधकाम करण्याकरिता निविदा मागवून सल्लागार कंपनीची निवड करण्यात आली आहे. (BMC News)


मुंबईच्या हद्दीतील मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे टाकण्यासाठी व मलजल प्रक्रिया केंद्राची संकल्प चित्रे बनविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याकरिता सल्लागाराची नेमणूक करून सल्लागारांची यादी तयार करुन ३ वर्षाच्या कालावधीकरिता नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी अनुभवी सल्लागारांचे पॅनल तयार करून त्यांच्याकडून सेवा घेण्यात येत आहे. (BMC News)



पॅनल मधील सल्लागार यांचे काय असेल काम :


- सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार सेवा पुरविणे.


- सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांसह पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक आणि कायदेशीर सहाय्यासह आणि पर्यायी महसूल स्त्रोतांसह तांत्रिक व्यवहार सल्लागार सेवा आणि बोली प्रक्रिया व्यवस्थापन सेवा प्रदान करणे.


- प्रकल्प अंमलबजावणी कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांसाठी तटस्थ अभियंता / प्राधिकृत अभियंता म्हणून काम करणे, मुंबई महानगरपालिका अनुदानित प्रकल्पांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि तांत्रिक लेखा परीक्षक म्हणून काम करणे.


-प्रचालने आणि देखरेख कालावधीत पर्यवेक्षण, देखरेख



नियुक्त १२ सल्लागार कंपनीची नावे तसेच त्यांचे पॅनेल :


मे. टेक्नो लॅण्ड इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स,


मे. अर्थिया कन्सल्टींग इंजिनिअर्स काईट अलाईड सर्व्हिस (जेव्ही),.


मे, एनजेएस इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि.,


मे. स्थापती डिझाइनर्स अँड कन्सल्टंटस् - जिवानी कॉन्स्ट्रुमा (जेव्ही),


मे. यश इंजिनिअरिंग कन्सल्टंटस् प्रा. लि.


मे. वाटमोव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि.,


मे. व्हापकोस लिमिटेड,


मे. अन्वया कन्स्ट्रक्शन कन्सल्टन्सी प्रा. लि.,


मे. प्रिमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंटस्-टेक्नोजेम कन्सल्टंटस् (जेव्ही),


मे. डिआरए कन्सल्टंटस् प्रा. लि.,


मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि.,


मे. यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स एलएलपी

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.