DCM Eknath Shinde : काल 'जोर का झटका लगा', यानंतर आणखी झटके लागणार!

विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये


मुंबई : "विरोधकांकडचे मुद्दे संपले असून पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. काल जो त्यांना जोर का झटका धीरे से लागला, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि पुढे आणखी झटके बसणार आहेत," असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केला.


अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना फटकारताना शिंदे म्हणाले की, सभागृहाचे कामकाज पूर्णपणे नियमांनुसार चालत असून अध्यक्षांनी विरोधकांना प्रश्न मांडण्यासाठी भरपूर संधी दिली आहे. तरीही प्रश्नांची उत्तरे ऐकण्याऐवजी गोंधळ घालणे आणि स्टंटबाजी करणे एवढाच विरोधकांचा कार्यक्रम राहिला आहे, अशी टीका त्यांनी केली. विरोधकांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, सरकारला प्रश्न विचारायचे आणि उत्तराची वेळ आली की सभागृहातून बाहेर पडायचे, ही विरोधकांची जुनी सवय आहे. "प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये," असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली.



शेतकरी प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनाही शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत ४५ हजार कोटी रुपयांची मदत दिली असून नुकसानभरपाईचे निकष बदलून दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. "शेतकऱ्यांवर अन्याय झाला, सरकारने मदत केली नाही, हा विरोधकांचा दावा म्हणजे निव्वळ दिशाभूल आहे. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विरोधकांची राजकीय स्पेस दिवसेंदिवस कमी होत आहे, तर महायुतीवरील जनतेचा विश्वास वाढत आहे," असा टोला त्यांनी लगावला.


सभागृहाच्या पावित्र्याचा मुद्दा उपस्थित करताना शिंदे यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना सुनावले. अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल करत त्यांनी विरोधकांना खडसावले. २०१९ ते २०२२ या काळात विरोधी पक्षातील अनेक नेते सभागृहात नियमित उपस्थित राहत नसत, याची आठवण करून देत शिंदे यांनी विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. "जो शीशे के घर में रहते हैं, वो दुसरों के घर पर पत्थर नहीं मारते," असे म्हणत त्यांनी विरोधकांना आरसा दाखवला.

Comments
Add Comment

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण