Nashik : FDA अधिकाऱ्यांच्या नावाखाली खंडणी ! शहरात FDA च्या धाडी सुरू असताना तोतया अधिकाऱ्यांचा प्रताप

Nashik : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून राज्यभर भेसळविरोधी धाडींचे सत्र सुरू असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही तोतया अधिकाऱ्यांनी बेकरी व्यावसायिकांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला FDA अधिकारी असल्याचे भासवत कारवाईची भीती दाखवून हजारो रुपये उकळणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) पर्दाफाश केला आहे.


या प्रकरणात महिलेसह तिघांविरुद्ध फसवणूक व खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या टोळीतील दोघे जण एका स्थानिक खासगी वृत्तवाहिनीशी (Local private news channel) संबंधित कॅमेरामन आणि प्रतिनिधी असल्याची माहिती समोर आली आहे, तर महिला संशयित एका संस्थेची पदाधिकारी असल्याचे समजते.



नेमकं प्रकरण काय ?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी कारगिल चौक परिसरातील एका बेकरीत जाऊन संशयितांनी बनावट ओळखपत्र दाखवत स्वतःची FDA अधिकारी म्हणून ओळख करून दिली. दुकानातील खाद्यपदार्थांचे फोटो व व्हिडिओ काढल्यानंतर परवाना रद्द करण्याची आणि दुकान बंद करण्याची धमकी देण्यात आली. या भीतीपोटी व्यावसायिकाकडून १५ हजार रुपये रोख आणि ३ हजार रुपये ऑनलाइन घेतल्याचा आरोप आहे.


याच दिवशी द्वारका परिसरातील आणखी एका बेकरी व्यावसायिकालाही अशाच पद्धतीने जाळ्यात ओढण्यात आले. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवत त्याच्याकडूनही १५ हजार रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.



खासगी वृत्तवाहिनीशी संबंधित दोघांसह महिलेविरुद्ध गुन्हा


रिजवान इब्राहिम खान यांच्या फिर्यादीवरून रोशन चांगदेव गव्हाणे, विजय चुनीलाल बागूल आणि राजनंदिनी उर्फ रागिणी संतोष अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले करीत आहेत.



FDA अधिकाऱ्यांची आधी ओळख पटवा


सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभर धाडी सुरू असल्याने व्यावसायिकांनी कोणतीही तपासणी करणाऱ्या व्यक्तीची अधिकृत ओळखपत्रे आणि आदेशपत्र तपासूनच सहकार्य करावे. संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिस किंवा संबंधित शासकीय विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''