Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून २४ ते २७ जूनदरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक अंतर्गत भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला असून शहराच्या बहुतांश भागांत संततधार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा प्रादेशिक हवामान केंद्राकडून होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस शहरात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून जुलैच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra Monsoon 2026)


मुंबईतील सायन परिसरात सकाळच्या गर्दीच्या वेळी एक बेस्ट बस रस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आणि मोठी कोंडी निर्माण झाली. दिवसभर ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता असून पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांसाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जारी केला आहे. (Maharashtra Monsoon 2026)




रायगड जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण असून माणगाव, म्हसळा, महाड आणि पोलादपूर तालुक्यांत हलक्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यासाठी हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अखेर दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी भात रोपवाटिका करपण्याच्या मार्गावर होत्या आणि अनेक गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. मात्र नव्याने सुरू झालेल्या पावसामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. (Maharashtra Monsoon 2026)



सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कालपासून पाऊस सक्रिय झाला असून गेल्या चोवीस तासांत सरासरी ८०.८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. देवगड तालुक्यात सर्वाधिक १२६ मिलिमीटर पाऊस पडला. पुढील पाच दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने जिल्ह्यासाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे रस्ते, ओढे आणि नाल्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Monsoon 2026)

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि