Kunal Shah : मुंबईकर कुणाल शाह चर्चेत; FreeCharge ते CRED असा प्रेरणादायी प्रवास

मुंबई : विल्सन कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात पदवी घेतल्यानंतर मॅनेजमेंटचे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुंबईकर कुणाल शाह यांचं नाव आज देशातील सर्वात यशस्वी उद्योजकांमध्ये घेतलं जातं. फिनटेक (FinTech) क्षेत्रातील प्रसिद्ध स्टार्टअप CRED चे संस्थापक असलेले कुणाल शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या यशस्वी व्यावसायिक प्रवासामुळे ते जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानले जातात.


जगभरातील ३०० कोटींहून अधिक युजर्स वापरत असलेल्या WhatsApp च्या नेतृत्वाची जबाबदारी आता कुणाल शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. Meta ने WhatsApp चे विद्यमान प्रमुख विल कॅथकार्ट यांच्या जागी CRED चे संस्थापक कुणाल शाह यांची नियुक्ती जाहीर केली असून, यामुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय नेतृत्वाची आणखी एक महत्त्वाची नोंद झाली आहे.



अहवालांनुसार, Meta Platforms ने CRED मध्ये सुमारे ९०० दशलक्ष डॉलर (सुमारे ८ हजार ५५० कोटी रुपये) गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. या गुंतवणुकीनंतर CRED चे मूल्यांकन सुमारे ४.५ अब्ज डॉलर (सुमारे ४३ हजार २३९ कोटी रुपये) इतके झाल्याचे सांगितले जात आहे.



CRED चा यशस्वी प्रवास


सन २०१८ मध्ये सुरू झालेल्या CRED या प्लॅटफॉर्मने सुरुवातीला क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणाऱ्या ग्राहकांना Rewards देण्याची सेवा सुरू केली होती. आज CRED हे Payment, Loan, Insurance आणि Wealth Management यांसारख्या आर्थिक सेवांसाठी लोकप्रिय प्लॅटफॉर्म बनले आहे.


कंपनीचे सध्या दरमहा सुमारे १.७ कोटी Active Members आहेत. भारतातील क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपैकी ४० टक्क्यांहून अधिक व्यवहार CRED वरून होत असल्याचा दावा केला जातो. कंपनीचा वार्षिक Revenue सुमारे ३ हजार २०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला असून कंपनी नफ्यात आल्याचेही सांगितले जाते.



कोण आहेत कुणाल शाह?


कुणाल शाह यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी विल्सन कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी NMIMS मध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता, मात्र त्यांनी ते शिक्षण पूर्ण केले नाही. कुणाल शाह यांनी सन २०१० मध्ये FreeCharge या Digital Payment Platform ची स्थापना केली होती. पुढे सन २०१५ मध्ये Snapdeal ने FreeCharge सुमारे ४५० दशलक्ष डॉलरना विकत घेतले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या भांडवलातून CRED ची स्थापना केली आणि कंपनीला देशातील अग्रगण्य FinTech Startup बनवले.



याशिवाय त्यांनी Unacademy, Razorpay, Spinny आणि MPL (Mobile Premier League) यांसारख्या अनेक यशस्वी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.



तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण


शिक्षण अर्धवट राहिलं तरी जिद्द, दूरदृष्टी आणि नाविन्यपूर्ण विचारांच्या जोरावर जागतिक स्तरावर यश मिळवता येतं, हे कुणाल शाह यांनी आपल्या कारकिर्दीतून सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे आज ते देशातील लाखो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.