George Kurien : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याचा अचानक राजीनामा; राष्ट्रपतींकडून तात्काळ मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपतींनी तो तात्काळ मंजूर केला आहे. राष्ट्रपती भवनाने मंगळवारी (२३ जून) याबाबत अधिकृत घोषणा केली. त्यामुळे कुरियन यांची केंद्रीय मंत्रिमंडळातील कारकीर्द सध्या तरी संपुष्टात आली आहे. (George Kurien)


जॉर्ज कुरियन हे केंद्र सरकारमध्ये अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी दोन्ही मंत्रालयांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. (George Kurien)



संविधानातील तरतुदीनुसार मंजूर झाला राजीनामा :


राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ७५(२) अंतर्गत पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. या निर्णयानंतर ते अधिकृतपणे केंद्रीय मंत्रिपदावरून मुक्त झाले आहेत. (George Kurien)



राजीनाम्यामागचं नेमकं कारण काय?


जॉर्ज कुरियन हे लोकसभा सदस्य नसून राज्यसभेच्या माध्यमातून मंत्रिमंडळात दाखल झाले होते. मात्र त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. भारतीय संविधानानुसार, मंत्रीपदावर कायम राहण्यासाठी संबंधित व्यक्ती संसदेतल्या कोणत्यातरी सभागृहाची सदस्य असणे आवश्यक असते. यावेळी भाजप नेतृत्वाने कुरियन यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिली नाही. परिणामी त्यांचे संसदीय सदस्यत्व संपले आणि नियमांनुसार त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. (George Kurien)



केरळ निवडणुकीच्या निकालांचाही परिणाम?


कुरियन यांनी पक्षाच्या आदेशानुसार केरळ विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागे केवळ घटनात्मक कारणेच नव्हे, तर पक्षांतर्गत राजकीय समीकरणांचाही प्रभाव असू शकतो, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कुरियन यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या जागी मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. (George Kurien)

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण