Healthy Monsoon Diet : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?

पावसाळा (Monsoon) सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. हवेत वाढलेली आर्द्रता आणि ओलावा यामुळे बॅक्टेरिया व बुरशीची वाढ वेगाने होते. त्यामुळे काही पदार्थ खाल्ल्यास पोटाचे विकार, संसर्ग आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात आहार निवडताना सावध राहणं गरजेचं आहे. (Monsoon Diet Tips)




'हे' पदार्थ टाळावेत


पावसाळ्यात पालक, मेथी, कोबी आणि फ्लॉवर यांसारख्या पालेभाज्या कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. या भाज्यांवर जंतू आणि कीटकांची वाढ होण्याची शक्यता अधिक असते. त्याऐवजी कारले, दोडके, तोंडली आणि भोपळा यांसारख्या भाज्या खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. (Healthy Foods in Monsoon)


कच्च्या भाज्या आणि कच्चे स्प्राउट्स खाणेही टाळावे. त्याऐवजी भाज्या वाफवून किंवा शिजवून खाव्यात. सीफूड, विशेषतः मासे आणि इतर समुद्री खाद्यपदार्थ खाताना देखील काळजी घ्यावी. दूषित पाण्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.


पावसाळ्यात जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाणे टाळावे. समोसे, पकोडे, कचोरी यांसारखे पदार्थ चवीला छान वाटत असले तरी पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात. मशरूम आणि शिमला मिरचीचे सेवनही मर्यादित ठेवावे.




पावसात खा 'हे' पदार्थ 


पावसाळ्यात आवर्जून खाण्यासारख्या दोन गोष्टी म्हणजे प्रोबायोटिक पदार्थ आणि पुरेसे पाणी. दही, ताक, चीज किंवा इतर प्रोबायोटिक पदार्थ पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच दिवसातून पुरेसे पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि आरोग्य चांगले राहते. (Immunity Boosting Foods)


शक्य असल्यास उकळलेले किंवा कोमट पाणी पिण्याची सवय लावा. पावसाळ्यात योग्य आहार आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते.


Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''