BMC News : मुंबईतील सर्व नैसर्गिक तलाव, जलाशयांचे पुनरुज्जीवन करा

- यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आमदार अमित साटम यांची मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमीत साटम यांनी मुंबई महापालिकेने (BMC News) केवळ पावसावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरातील सर्व नैसर्गिक तलाव (natural lakes) आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करावे, तसेच त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्प उभारून उपलब्ध पाण्याचा वापर करावा, अशी मागणी महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (BMC News)



मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawade) आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार यांनी पत्र पाठवून ही मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला झालेला विलंब हा शहरातील पाणी टंचाईस कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पावसावर १०० टक्के अवलंबून राहणे दिवसेंदिवस अधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी जलस्रोतांचा गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे साटम यांनी म्हटले आहे. (BMC News)



शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार करावा, तसेच त्या ठिकाणी आरओ प्रकल्प उभारून पाणी वापरयोग्य बनवावे, अशी मागणीही साटम यांनी केली आहे. यानंतर परिसरातील भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वितरण यंत्रणा उभारता येईल. भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन क्षारनिर्मूलन (डिसॅलिनेशन) प्रकल्पाची क्षमता १००० एमएलडीपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. यासाठीचे काम कोणताही विलंब न करता तातडीने सुरू करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. (BMC News)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.