Nashik : स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला अखेर हिरवा कंदील,आचारसंहितेचा अडसर दूर; इच्छुकांच्या हालचालींना वेग

Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची रखडलेली प्रक्रिया आता पुन्हा मार्गी लागणार आहे. महापालिका (Nashik Municipal Corporation)  निवडणुकीनंतर तब्बल सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या प्रक्रियेला आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला होता. मात्र, नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता गुरुवारी (दि. २५ ) संपुष्टात येत असल्याने स्वीकृत नगरसेवक निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.


स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीबाबत गेल्या काही महिन्यांपासून राजकीय हालचाली सुरू होत्या. नगरसचिव संजय नेरकर यांनी एप्रिल महिन्यात आयुक्तांना पत्र देऊन संबंधित पक्षांच्या गटनेत्यांकडून नावे मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत कळविले होते. मात्र, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पुढील कार्यवाही थांबली होती.



जानेवारीमध्ये महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पदाच्या निवडी झाल्या. नियमानुसार त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती अपेक्षित होती. मात्र, पक्षांकडून नावे सादर करण्यास विलंब झाल्याने ही प्रक्रिया रखडली. आता आचारसंहिता संपल्यानंतर आयुक्तांकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्यांना नावे सादर करण्याबाबत सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली जाईल.



दहा जागांसाठी राजकीय गणित


महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांपैकी सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सहा जागा येणार आहेत. तर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाला प्रत्येकी दोन जागा मिळणार आहेत. महापालिकेतील पक्षीय बलाबलाच्या आधारे हे गणित निश्चित झाले आहे. यापूर्वी स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच होती.



इच्छुकांची लॉबिंग वाढली


स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाकडे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपसह दोन्ही शिवसेना गटांमध्ये या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर निवडीचे आव्हान उभे राहणार आहे. नियुक्तीनंतर काही इच्छुकांमध्ये नाराजीचे सूर उमटण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु