Mumbai Monsoon BMC : मुंबईत मुसळधार पाऊस; महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज, सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा

- मालाड मालवणीत ३४० तर शहरांत परळ भागांत ३३४ मिमी पाऊस


मुंबई (विशेष प्रतिनिधी )


मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत ३०० मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून ७ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. (Mumbai Monsoon BMC)


सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली असली तरी महानगरपालिकेने स्थापित केलेले पंप, पर्जन्यजल उपसा केंद्रे तसेच पूरनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा होत असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. (Mumbai Monsoon BMC)


महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सखल भाग, रेल्वे स्थानके, महत्त्वाचे रस्ते, पूल तसेच किनारी भागांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. संबंधित विभागांचे अभियंते, कर्मचारी आणि नियंत्रण कक्ष अहोरात्र २४ तास कार्यरत असून नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. (Mumbai Monsoon BMC)



नालेस्वच्छता, पर्जन्यजल वाहिन्या आणि जलनिचरा व्यवस्थेची नियमित पाहणी सुरू असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री घटनास्थळी पाठविण्यात येत आहे. तसेच झाडे पडणे, शॉर्टसर्किट, जलभराव किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि इतर संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. (Mumbai Monsoon BMC)


नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आहे. (Mumbai Monsoon BMC)



दरम्यान, पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवत असल्याचे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी नमूद केले आहे. (Mumbai Monsoon BMC)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने