Mumbai News : मुंबईतील जुन्या भागांचे रूप पालटणार

म्हाडाचे ९२५ एकरांवर ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ४ लाख कोटींची होणार गुंतवणूक



मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील शहरातील (Mumbai) जुन्या आणि जीर्ण झालेल्या म्हाडा वसाहतींच्या (MHADA) पुनर्विकासासाठी म्हाडाने हाती घेतलेल्या ९२५ एकर क्षेत्रावरील ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे तब्बल ४ लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांना आधुनिक घरे मिळणार असून मुंबईच्या पायाभूत सुविधांनाही नवे बळ मिळणार आहे.
म्हाडाच्या ‘कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी' (सीअँडडीए) मॉडेलअंतर्गत हे प्रकल्प राबवले जात आहेत. या माध्यमातून मुंबईतील अनेक दशकांपूर्वी उभारलेल्या वसाहतींचे रूपांतर अत्याधुनिक टाउनशिपमध्ये केले जाणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन, वरळीतील आदर्श नगर, अंधेरीतील एस.व्ही.पी.नगर, गोरेगावमधील मोतीलाल नगर, कांदिवली, बोरिवली आणि खार परिसरातील वसाहतींसह अनेक महत्त्वाच्या भागांचा या योजनेत समावेश आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या प्रकल्पांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी चैतन्याची लाट निर्माण झाली आहे.




या पुनर्विकास मोहिमेअंतर्गत सुमारे ७५ हजार पुनर्वसन घरे उभारली जाणार असून त्यासोबतच ३० हजारांहून अधिक नवीन घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. आधुनिक वास्तुरचना, प्रशस्त रस्ते, हरित क्षेत्रे, पार्किंग सुविधा, समाजमंदिरे, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा यांचा समावेश असलेल्या या टाउनशिप नागरिकांच्या जीवनमानात मोठी सुधारणा घडवून आणतील. अनेक जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित व अधिक सोयीस्कर निवासस्थान मिळणार असल्याने या प्रकल्पांकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.


 


पुढील काही वर्षांत हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मुंबईचा चेहरामोहरा मोठ्या प्रमाणात बदललेला दिसेल. जुन्या वसाहतींच्या जागी आधुनिक, नियोजित आणि जागतिक दर्जाच्या टाउनशिप उभ्या राहतील. त्यामुळे म्हाडाचा हा ९२५ एकरांचा पुनर्विकास आराखडा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून मुंबईच्या भविष्यातील विकासाचा पाया ठरणार असल्याचे मानले जात आहे

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर