Anna Bansode : चिंचवडमध्ये ‘अजितसृष्टी’

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे; 'एमआयडीसी'चे प्लॉटिंग तात्काळ थांबवण्याचे निर्देश
मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच संबंधित जागेवरील एमआयडीसीचे प्लॉटिंग तात्काळ थांबवावे, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी दिले.



विधानभवन येथील उपाध्यक्ष कार्यालयाच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात चिंचवड येथील आरक्षण क्रमांक ३०१ ही जागा पर्यटन केंद्रासाठी राखीव असून जुन्या तसेच नव्या प्रारूप विकास आराखड्यातही हे आरक्षण कायम आहे. सद्यस्थितीत ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. मात्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) या जागेवर प्लॉटिंग करून ती खाजगी उद्योजकांना विक्री करण्याचे नियोजन केल्याची बाब निदर्शनास आली आहे. विकास आराखड्यातील आरक्षणाला बाधा पोहोचविणारे हे नियोजन रद्द करण्यात यावे, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी बैठकीत दिले.



या परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी वस्ती असून शाहूनगर परिसरात एमआयडीसीने कामगारांसाठी घरे योजना राबविलेली आहे. त्यामुळे पर्यटन केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेचे मूळ स्वरूप कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या जागेवर सुरू असलेले प्लॉटिंगचे काम तातडीने थांबवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विकास आराखड्यातील पर्यटन केंद्राचे आरक्षण कायम ठेवावे व त्याठिकाणी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला पिंपरी-चिंचवड(pimpari chinchvad) एमआयडीसीचे मुख्य अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने