Dr. Vipin Sharma : हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम चा डॉ. विपिन शर्मा यांनी स्वतः घेतला अनुभव

मुंबई (विशेष प्रतिनिधी )

मुंबईत सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी अंमलात आणलेल्या हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम- एचएमआयएस प्रणालीच्या निमित्ताने तांत्रिक आव्हाने, अंमलबजावणी, औषधसाठा, मनुष्यबळ आदी बाबींचा आढावा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी घेतला. तसेच प्रत्येक टप्प्यातील बारकावेही जाणून घेतले. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून या प्रणालीची अंमलबजावणी परिणामकारकपणे करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.


एचएमआयएस प्रणालीच्या वापराचा प्रत्यक्ष रूग्ण म्हणून अनुभव अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी घेतला. मुलुंड येथील प्रसुतीगृह आणि पीजेेके महानगरपालिका दवाखाना येथे त्यांनी बुधवारी भेट दिली. या प्रणालीचा वापरातील विविध टप्पे, तांत्रिक बाबी, रूग्णांसाठीची उपयुक्तता आदी गोष्टींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच प्रणालीच्या अंमलबजावणी आणि वापराबाबत समाधान व्यक्त केले.



मुलुंड येथील प्रसुतीगृह आणि पीजेेके महानगरपालिका दवाखाना येथे एचएमआयएस प्रणालीच्या वापराबाबतचा नागरिकांचा अनुभव आणि अभिप्रायदेखील डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी जाणून घेतला. त्याआधी दोन्ही ठिकाणी प्रणालीच्या अंमलबजावणीबाबतची माहिती डॉ. विपिन शर्मा यांना देण्यात आली. दवाखान्याच्या ठिकाणी स्वतःला ताप व घसा खवखवणे हा त्रास दोन दिवसापासून होत होता. त्यामुळे त्यांनी रूग्ण म्हणून उपचार ही घेतले आणि डॉ. विपिन शर्मा यांनी एचएमआयएस प्रणालीच नोंद करून घेतली. तसेच प्रणालीच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचारासाठीचे औषधदेखील घेतली . संपूर्ण यंत्रणेच्या वापर आणि अनुभव डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी स्वतः घेतला. दवाखाना आणि प्रसूतीगृह याठिकाणी असलेल्या स्वच्छतेचेही डॉ. शर्मा यांनी कौतुक केले. संपूर्ण वैद्यकीय सुविधेच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या कामगिरी आणि कौशल्याची डॉ. शर्मा यांनी यावेळी आवर्जून प्रशंसा केली. नागरिकांच्या सेवेत घरोघरी फिरणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतही डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी संवाद साधला.



बुधवारी डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रूग्णालय येथील प्रस्तावित दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली. रूग्णालय परिसरात सुरू असणाऱ्या कामाची आणि रूग्णालयातील व्यवस्थेची उपाय योजना माहिती त्यांनी जाणून घेतली. या रुग्णालयाच्या प्रस्तावित कामाशी संबंधित आढावा बैठक तातडीने घेण्याचेही निर्देश डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी दिले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.