Devendra Fadnavis : संजय दीना पाटलांना योग्य समज द्या;

मुंबई : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धमकी दिल्याचा आणि जाहीरपणे शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fandvis) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, "महायुतीमध्ये लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबाबत अशी बेजबाबदार आणि शिवराळ भाषा अजिबात खपवून घेतली जाणार नाही. संबंधित खासदारांना तातडीने आणि कडक शब्दांत योग्य समज देण्यात यावी, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल," अशी नाराजी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांना बोलून दाखवली आहे.



गुरुवारी ३ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या प्रकरणाबाबत तातडीची बैठक पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बंद दाराआड झालेल्या बैठकीत खासदार संजय दीना पाटील यांच्या विधानाचा अत्यंत कठोर शब्दांत निषेध केला. "गेल्या काही महिन्यांत शिवसेनेतील नेत्यांकडून सातत्याने जाहीरपणे वादग्रस्त विधाने केली जात आहेत. मात्र, पत्रकारांना पोलिसांसमोर जाहीरपणे धमकावणे आणि शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.



"महायुतीची प्रतिमा अशा विधानांमुळे मलिन होत असून यापुढे अशा प्रकारची दादागिरी आणि वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. खासदार पाटील यांना तातडीने समज द्या, अन्यथा गृह खाते म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल," असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिल्याचे समजते.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून