Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. वादाच्या वेळी अनवधानाने वापरलेल्या अपशब्दांबद्दल त्यांनी संपूर्ण माध्यम प्रतिनिधींची माफी मागितली. तसेच, माझ्या राजकीय भूमिकेवर जरूर टीका करा; मात्र माझ्या कुटुंबाला, विशेषतः दिवंगत वडिलांना राजकारणात ओढू नका, अशी भावनिक विनंतीही त्यांनी केली.



याबाबत बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले, मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सातत्याने अपमान सहन करत आहे. आज सकाळी पत्रकार मित्र पुन्हा आले तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती केली होती की, या विषयावर मला अधिक काही बोलायचे नाही. मात्र तोच प्रश्न वारंवार विचारला गेल्याने वाद वाढला. त्या गोंधळात माझ्याकडून अपशब्द निघाले. त्याबद्दल मी सर्व पत्रकार(Repotar) बंधू-भगिनींची मनापासून माफी मागतो.



ते पुढे म्हणाले, माझ्यावर राजकीय टीका करण्यास माझी हरकत नाही. पण माझी पत्नी, मुलगी, आई आणि आज हयात नसलेले वडील यांच्याबाबत खोट्या गोष्टी पसरवणे किंवा अपशब्द वापरणे अयोग्य आहे. माझ्या राजकीय भूमिकेवर तुम्हाला जे बोलायचे आहे ते जरूर बोला, पण कृपया माझ्या कुटुंबाला यापासून दूर ठेवा.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा