Prahar The Ujjwal Nikam Story: 'प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी'चा टीझर रिलीज; ललित प्रभाकरची अवतार पाहून चाहते थक्क

मुंबई : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला हा देशाच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी घटनांपैकी एक मानला जातो. या हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्याविरोधात न्यायालयात यशस्वीपणे लढणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची कहाणी आता 'प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी' (Prahar The Ujjwal Nikam Story) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. (Prahar The Ujjwal Nikam Story)


निर्माता दिनेश विजन यांच्या 'मॅडडॉक फिल्म्स'ने नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर, कलाकारांचे लूक आणि टीझर प्रदर्शित केले. टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, एका कास्टिंगने मराठी प्रेक्षकांना विशेष धक्का दिला आहे.




 

ललित प्रभाकरची भूमिका महत्त्वाची


मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर या चित्रपटात अजमल कसाबची भूमिका साकारत आहे. आजवर रोमँटिक आणि सकारात्मक भूमिकांमधून ओळख निर्माण करणाऱ्या ललितचा हा पूर्णपणे वेगळा आणि आव्हानात्मक अवतार पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्या या भूमिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.


तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत अभिनेता राजकुमार राव झळकणार आहे. या भूमिकेसाठी राजकुमारने कोणताही कृत्रिम मेकअप किंवा प्रोस्थेटिक्स न वापरता निकम यांची देहबोली, बोलण्याची शैली आणि न्यायालयातील व्यक्तिमत्त्व आत्मसात करण्यावर भर दिला आहे.



दिग्दर्शक अविनाश अरुण यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात वामिका गब्बी, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


'प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट ७ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझरनंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली असून, २६/११ हल्ल्यानंतरच्या न्यायालयीन लढ्याची कथा मोठ्या पडद्यावर कशी साकारली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण