Vaibhav Sooryvanshi : वैभवसाठी बीसीसीआयचे खास नियम ! दौऱ्यात टीमसोबत राहता येणार नाही ?

Mumbai : भारतीय संघ या आठवड्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे, तिथे दोन सामन्यांची टी-२० मालिका (T-20 Series) होणार आहे. आयपीएलमधील आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वैभवने भारतीय वरिष्ठ संघात आपले स्थान मिळवले असून, तो या दौऱ्यासाठी संघासोबत प्रवास करणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याचा सहभाग जवळपास निश्चित मानला जात आहे. भारतीय निवड समितीने आयर्लंड, इंग्लंड आणि आशियाई खेळांच्या दौऱ्यांसाठी टी-२० संघाची निवड केली आहे. इंग्लंडमधील नियमांमुळे, तो इंग्लंड दौऱ्यादरम्यान वरिष्ठ संघासोबत ड्रेसिंग रूम (Dressing Room) शेअर करू शकणार नाही. परिणामी, बीसीसीआयने वैभवसाठी एक विशेष नियम जाहीर केला आहे.




वैभवसाठी बीसीसीआयचे खास नियम ?


इंग्लंडमधील बालसुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधित कायद्यांमुळे वैभवला वरिष्ठ संघासोबस ड्रेसिंग रूम शेअर करता येणार नाही आहे. या नियमाच्यानुसार १६ वर्षाच्या खालील खेळाडूसाठी आयसीसीचे कोणतेही विशिष्ट नियम नाही. भारतविरुद्ध इंग्लंड टी-२० मालिका ही द्विपक्षीय मालिका असून ही स्पर्धा आयसीसीचा भाग नसेल.


२६ आणि २८ जून रोजी बेलफास्ट येथे खेळल्या जाणाऱ्या दोन टी-२० सामन्यांसाठी वैभवला एक स्वतंत्र चेंजिंग रूम दिली जाईल. क्रिकेट आयर्लंडच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय संघाला पॅव्हेलियनमध्ये तीन स्वतंत्र खोल्या देण्यात आल्या आहेत आणि त्यांना संबंधित नियमांविषयी माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआय यूकेच्या कायद्यांनुसार सर्व व्यवस्थांचा आढावा घेईल. आमच्या सर्व कार्यपद्धती आणि धोरणे यूकेमधील सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत आहेत. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार, इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांदरम्यान प्रत्येक ठिकाणी वैभवला एक स्वतंत्र चेंजिंग रूम दिली जाईल. तथापि, सामन्यांदरम्यान आणि संघाच्या बैठकांमध्ये त्याला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये राहण्याची परवानगी असेल.





तिरंगी मालिकेत वैभवची कामगिरी


वैभवने नुकताच श्रीलंकेत झालेल्या तिंरगी मालिकेत चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. त्याने या मालिकेत लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावाच विक्रम आपल्या नावी केला आहे. त्याने केवळ 11 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला. वैभवने 29 चेंडूंमध्ये 94 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये 10 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. वैभवने या मालिकेत पाच सामन्यात २११ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून